Aam Aadmi Party News: मध्य प्रदेश-छत्तीसगडसाठी 'आप'चा मोठा निर्णय; 'या' दोन बड्या नेत्यांवर सोपवली धुरा

Madhya Pradesh-Chhattisgarh News: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा मोठा निर्णय़
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पाच राज्याच्या निवडणुका भाजप आणि काँग्रेससाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या निवडणुकींसाठी काँग्रेस आणि भाजप मोठी रणनीती देखील आखत असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता या निवडणुकीच्या मैदानात आम आदमी पार्टी देखील उतरणार आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून या दोन्ही राज्यासाठी सहप्रभारीपदाच्या नियुक्त्या केल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या छत्तीसगड राज्य सहप्रभारीपदाची कमान अमोलक सिंह और अमृतपाल सिंह सुखानंद यांच्याकडे सोपवण्यात आली. तर मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी जगतार सिंह दियालपुरा आणि रजनीश कुमार दहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Arvind Kejriwal
Lok Sabha 2024 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडचे 'निकाल' ठरविणार पुढचा पंतप्रधान? काय आहेत राजकीय समीकरणे?

एवढंच नव्हे तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी लवकरच अधिकृत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच 'आप'ने पक्ष संघटनेत बदल करत पक्षाच्या सहप्रभारीपदाच्या नियुक्‍त्या केल्यामुळे 'आप' देखील अॅक्टिव्ह मोडवर आल्याचे बोलले जात आहे.

एकीकडे आम आदमी पक्ष विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत सामील झाला आहे. मात्र, दुसरीकडे आम आदमी पक्ष या निवडणुकीत ताकदीनिशी उतरण्याची तयारी करत आहे. ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी छत्तीसगडमध्ये सभा घेत मोफत वीज, महिलांना प्रति महिना सन्मान निधी आणि बेरोजगारांना तीन हजार रुपयांचा महागाई भत्ता देणार असल्याची घोषणा देखील केली.

दिल्लीप्रमाणे अनेक सोयी-सुविधा मोफत देण्याच्या घोषणा अरविंद केजरीवाल यांनी छत्तीसगडमध्ये केल्या आहेत. केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबमधील कारभाराचे दाखले देखील तेथील मतदारांना दिले. जर आम आदमी पक्ष ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे गेले तर भाजप आणि काँग्रेसचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com