एकही निवडणूक न लढलेला वकील बनला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Election 2022) रणधुमाळी सुरू आहे.
Arvind Kejriwal and Amit Palekar
Arvind Kejriwal and Amit PalekarSarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. आम आदमी पक्ष (AAP) गोव्यातील मैदानात आक्रमकपणे उतरला आहे. आपने आता राज्यातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. सामाजिक कार्यकर्ते व वकील अमित पालेकर (Amit Palekar) यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून आपने सगळ्यांनाच धक्का दिला आहे.

आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आज पालेकर यांच्या नावाची घोषणा केली. या वेळी पालेकर यांनी केजरीवालांना आलिंगन दिले. या प्रसंगी आपच्या आमदार आतिशी याही उपस्थित होत्या. पालेकर हे भंडारा समाजातील आहे. गोव्यात या समाजाचे लोकसंख्येतील प्रमाण 35 टक्के आहे. यामुळे पालेकर यांची निवड करताना आपने सामाजिक गणितही लक्षात घेतल्याचे दिसत आहे. पालेकर यांनी अद्यापपर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. मात्र, त्यांची आई दहा वर्षे सरपंच होती.

उपोषणामुळे आले होते चर्चेत

गोव्यातील वारसा स्थळांच्या ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना विरोध केल्याने पालेकर चर्चेत आले होते. बेकायदा बांधकामांना विरोध करण्यासाठी त्यांनी उपोषण केले होते. या उपोषणाला गोव्यातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता. पालेकर हे 46 वर्षांचे असून, पेशाने वकील आहेत. त्यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना सेंट क्रूज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आला आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा आहे.

Arvind Kejriwal and Amit Palekar
बार्शीच्या विशाल फटे प्रकरणात आता आंधळकरांची उडी

प्रामाणिक चेहऱ्याची निवड

केजरीवाल म्हणाले की, पक्षाने गोव्यात प्रामाणिक व्यक्तीची निवड केली आहे. समाजाच्या कल्याणासाठी काम केलेल्या व्यक्तीला आम्ही निवडले आहे. गोव्यासाठी ज्याचे हृदय धडधडते अशा व्यक्तीची निवड करण्यात आली आहेत. गोव्यातील जनतेला आता बदल हवा आहे. आपला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. दिल्लीतील प्रशासनाच्या मॉडेलचे लोकांना कौतुक आहे. राज्यभरात पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

Arvind Kejriwal and Amit Palekar
मुलायमसिंहांच्या सूनबाईंचा प्रवास समाजकारण ते राजकारण

पंजाबमध्ये आपकडून भगवंत मान

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत (Punjab Election 2022) आपने दोनवेळा खासदार राहिलेले नेते भगवंत मान (Bhagwant Mann) यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. त्यांना नागरिकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. आपने मागील आठवड्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा ठऱवण्यासाठी मोबाईवर मेसेज पाठवण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले होते. केजरीवाल यांनी मान यांच्या नावाची घोषणा केली. मान यांना मोबाईल आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 93 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. यामध्ये 21 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com