Delhi BJP news : भाजपच्या राम शिंदेंनी डिवचलं; आता 'AAP' अन् काँग्रेस रडणार

AAP Arvind Kejriwal Congress Rahul Gandhi Delhi Vidhan Sabha Elections 2025 EVM BJP Ram Shinde : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर AAP अन् काँग्रेस कसा रडीचा डाव खेळणार, यावर विधानपरिषद सभापती राम शिंदेंची प्रतिक्रिया.
BJP Ram Shinde
BJP Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Delhi Vidhan Sabha Elections News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागांसह एकहाती सत्ता मिळवत आहे. भाजप तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीच्या तख्तावर सत्ता गाजवणार आहे. आप आणि काँग्रेसचे पुरता धुव्वा उडला आहे. आप 22 जागांवर आघाडीवर होती, तर काँग्रेस पदरात तिसऱ्यांदा भोपळा फोडता आलेला नाही.

दिल्लीतील विजयाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. यावर सत्ताधारी आणि विरोधक प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, आप अन् काँग्रेसला डिवचलं आहे.

भाजपला (BJP) मिळालेले यशावर आता विरोधकांकडून आक्षेप घेतले जातील. ईव्हीएमवर खापर फोडले जाईल. काँग्रेस सातत्याने रडका डाव खेळत आली आहे. निवडणूक हरले की, ते 'EVM'ला दोष देतात, कर्नाटक जिंकलं त्यावेळेस 'EVM' छान होते. कुणावर तरी खापर फोडणे आणि कुणाला तरी बदनाम करणे ही काँग्रेसची रणनीती असते. दिल्ली इथं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी यात उडी घेतली आहे, असे प्रा. राम शिंदे यांनी म्हटले.

BJP Ram Shinde
Delhi congress news : काँग्रेस दिल्लीत सलग तिसऱ्यांदा 'शून्यात'; राहुल गांधींचं नेमकं कुठं चुकलं?

''EVM' संपूर्ण जगभरात सुरू आहे. दिल्लीतले (Delhi) रिझल्ट येत आहेत, भाजप जिंकत आहे. थोड्यावेळाने इथं देखील 'EVM'ला दोष देणे सुरू होईल. बोगस मतदार असते तर आधीच आक्षेप घ्यायचा निवडणूक हरल्यावर का आक्षेप घेतात. जिंकत असलं की 'EVM' चांगले आहे. तेव्हा 'EVM'चा विषय येत नाही', असा टोला देखील राम शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

BJP Ram Shinde
Sanjay Raut News : राऊतांचा भाजपच्या जिव्हारी लागेल, असा टोला; शाह अन् फडणवीसांमधील 'शीतयुद्धा'वर डिवचलं

भाजप दिल्लीत 27 वर्षानंतर पुनरागमन करत आहेत. दिल्ली भाजपची होणार आहे. तिथं विकासपर्व सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा, विकासाचा विजय आहे. देशभरात भाजप महायुतीचा विजय होत असताना, दिल्ली हरत असल्याचे शल्य भाजपच्या कार्यकर्त्यांना होते. पण लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला. दिल्लीतील भाजपच्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना जाते, असेही राम शिंदे यांनी म्हटले.

अजितदादांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया या दिग्गज नेत्यांचा यात पराभव झाला आहे. आप नेत्या मुख्यमंत्री आतिषी यांचा विजय झाला आहे. भाजपला 46 टक्के, तर आपला 43 टक्के मतं मिळाली आहेत. भाजपच्या दिल्लीतील विजयाचा महाराष्ट्रात कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com