Sanjay Raut News : राऊतांचा भाजपच्या जिव्हारी लागेल, असा टोला; शाह अन् फडणवीसांमधील 'शीतयुद्धा'वर डिवचलं

ShivSenaUBT Party MP Sanjay Raut CM Devendra Fadnavis Congress Rahul Gandhi Delhi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवर संजय राऊत यांचा जोरदार प्रतिक्रिया.
Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय शीतयुद्धाचे किस्से लपून नाहीत. देशात अन् विविध राज्यात भाजपला मिळत असलेल्या यशामुळे शाह आणि फडणवीस यांच्यातील शीतयुद्ध काहीसे थांबलेले दिसते.

काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या कालच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेवर फडणवीस यांनी टीका केली. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शाह अन् फडणवीस यांच्यातील शीतयुद्धावरून डिवचलं आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची कालची दिल्लीतील पत्रकार परिषद म्हणजे, दिल्लीतील पराभव दिसू लागल्याने तो कव्हर फायरिंग केली असल्याची टीका देवेंद्र फडणवीस केली. फडणवीस यांच्या या टीकेवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. यात अमित शाह अन् देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय शीतयुद्धावर निशाणाला साधताना भाजपला डिवचलं आहे.

Sanjay Raut News
BJP Vs Shivsena : शिंदेसेनेच्या 'या' मंत्र्यानं फडणवीसांविरोधात थोपाटले दंड; म्हणाले, 'अंतिम निर्णय माझाच...'

खासदार राऊत म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी. पण, अमित शाह (Amit Shah) असेपर्यंत ती त्यांनी मिळेल, असे वाटत नाही. दिल्लीत स्टार प्रचारक म्हणून गेले होते. त्यांनी तिथं प्रचार केला नसता, तरी तिथं हा निकाल आला असता. निकाल ठरलेलाच होता".

Sanjay Raut News
Nitesh Rane challenge to Congress : राजीनामे द्या अन् बॅलेटवर निवडून येऊन दाखवा; नितेश राणेंचे काँग्रेसला खुले आव्हान

देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संसदेत केलेले भाषण ऐकलं असतं, हेच मुद्दे मांडले होते. राहुल गांधींच्या भाषणावर प्रधानमंत्र्यांचा चेहरा खाली पडला होता. चेहरा काळा पडला होता. बोगस मतदान, 39 लाख मतं कशी वाढली. बूथ निहाय मतं कशी वाढवून घेतली. यंत्रणेवर कसा दबाव होता. याचे पुरावे. कशाप्रकारे नियमित मतदानापेक्षा 40 लाख जास्त मतं मोजली गेली. काल राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती समोर आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

'देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करणं गरजेचे आहे. मुख्यमंत्रीपदी बसलो अन् केंद्रात मंत्री म्हणजे, तो अधिक शहाणा असतो, असे नाही. काही भाग्य योग आहे. काही फ्राॅड भाग्य योगानं झालेले हे सरकार आहे', असाही टोला संजय राऊत यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com