

BJP vs AAP controversy : राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आपचे राज्यसभेतील संख्याबळ तीनपर्यंत खाली आले आहे. पक्षाचे संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री आतिशी याही पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
आतिशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सात खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपने आपवर निशाणा साधला आहे. आता केवळ केजरीवाल यांचा कोअर ग्रुप राहिला आहे. जे मिळून मिसळून बेकायदेशीर कामे करत आहेत. सर्व चांगले लोक सोडून गेले, अशी बोचरी टीका भाजपने केली होती.
आप संपणार असल्याचे सर्व दावे फेटाळून लावत आतिशी म्हणाल्या, भाजपने मागील १५ वर्षांत १५ वेळा आपसाठी शोक संदेश लिहिला आहे. प्रत्येक सहा महिन्यांत भाजप अरविंद केजरीवाल यांचे राजकारण संपले असल्याचे जाहीर करते. पण केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आप हा देशात वेगाने वाढणारा पक्ष बनला आहे.
आतिशी म्हणाल्या, केवळ दहा वर्षांत पक्षाने दिल्लीत तीनवेळा सरकार बनविले. पंजाबमध्ये पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढली आणि प्रमुख विरोधी पक्ष बनलो. दुसऱ्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्ता काबीज केली. गुजरात आणि गोव्यात आमचे आमदार विजयी झाले. जम्मू काश्मीरमध्येही आपचा एक आमदार आहे.
देशातील लोकांना आता पर्याय हवा असल्याचे यावरून दिसते. लोक आता वेगळे राजकारण शोधत असून तोच पर्याय आप बनत असल्याचा विश्वास आतिशी यांनी व्यक्त केला. ट्रायल कोर्ट आणि सीबीआय कोर्टाच्या आदेशाने भाजपच्या षडयंत्रचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. केजरीवालांविरोधात षडयंत्र रचल्याचे देशाने पाहिले, असे म्हणत आतिशी यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच पक्ष फुटीचे दावेही फेटाळून लावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.