
AAP Strategy to Pressure Congress: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पक्षाला भाजपने आस्मान दाखवलं. त्यानंतर पुढील निवडणुका स्वतंत्र लढवायच्या की इंडिया आघाडीसोबत लढवायच्या याबाबत आपचे नेते आत्मचिंतन करीत आहेत.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी सिंग यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आप स्वबळावर लढणार, अशी घोषणा केली होती. त्यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत आप स्वबळावर लढणार, अशी घोषणा आतिशी सिंग यांनी केली आहे, ती केवळ काँग्रेस पक्षावर दबाव आणण्यासाठी आणि हा दबाव आणून गोव्यात युती झाल्यास आपल्या जागा वाढवून घेण्यासाठीच,अशा प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
आतिशी या एक दिवशीय गोवा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बाणावली ‘आप’ कार्यालयात गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्व जागा लढविण्याचे ठरवले तर पालिका निवडणुकीतही ‘आप’चे जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार , असे त्या म्हणाल्या
‘आप’चे बाणावली आणि वेळ्ळी येथे दोन आमदार सध्या गोव्यात आहेत. सांताक्रुझमधून ‘आप’चे राज्य अध्यक्ष अमित पालेकर निवडणूक लढवू पाहात आहेत. मात्र या तिन्ही जागांवर काँग्रेसचाही दावा आहे. त्यामुळेच आता ‘आप’ने काँग्रेस विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणूक येण्यास अजून दोन वर्षे असून तोवर काहीही होऊ शकते, याकडे लक्ष वेधले. कित्येकदा दिल्लीतील नेते काही भूमिका घेतात, पण येथे गोव्यात वस्तुस्थिती वेगळीच असते. त्यामुळे नंतर निर्णय बदललेही जातात. अतिशी आमच्या पक्षाबद्दल बोललेल्या नाहीत. त्या काँग्रेसविरोधात बोलल्या, अन् हा प्रश्न त्या दोन पक्षांमधील आहे,असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणाले.
विधानसभा निवडणुकीला बराच वेळ आहे. कुठल्याही पक्षाने आपले वजन वाढवण्याच्या प्रयत्न केल्यास त्यात काहीही गैर नाही. मात्र, आतिशी यांनी आज जी भूमिका जाहीर केली तो एक दबावतंत्राचा भाग असावा असे वाटते. यापूर्वीही ‘आप’ने हरियाणा येथे अशीच भूमिका घेतली होती आणि नंतर दोष काँग्रेसला दिला होता.
-ॲड. क्लिओफात आल्मेदा कुतिन्हो (राजकीय विश्लेषक)
जर ‘आप’ गोव्यात विस्तार करू पाहत असेल तर त्यात गैर नाही. काहींना युतीची घोषणा आताच व्हावी, वाटते पण लगेच निर्णय म्हणजे या पक्षाची वाढ खुंटू शकते.
-प्रभाकर तिंबले (राजकीय विश्लेषक)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.