Maharashtra Budget 2025: अजितदादांनी शिंदेंना मागे टाकलं; तिसऱ्या क्रमांकावर असतानाही दुसऱ्या क्रमांकाचा निधी राष्ट्रवादीला

NCP gets second-highest funds: भाजपकडील खात्यानंतर अजितदादांनी आपल्या राष्ट्रवादीकडील खात्यांसाठी अधिकचा निधी वळवला आहे. निधीच्या बाबत अजितदादांनी शिंदेंना मागे टाकले आहे.
NCP gets second-highest funds
NCP gets second-highest fundsSarkarnama
Published on
Updated on

देवेंद्र फडणवीस सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत बजेट सादर केला. या बजेटमध्ये भाजपकडील खात्यांना झुकते माफ देण्यात येणे हे साहजिक आहे. पण महायुतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेकडील खात्यांना अजितदादांनी तिसऱ्या क्रमांकाचा निधी दिला आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अजितदादांनी मागे टाकले, अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री हे राष्ट्रवादीपेक्षाही अधिक आहे.

भाजपकडील खात्यानंतर अजितदादांनी आपल्या राष्ट्रवादीकडील खात्यांसाठी अधिकचा निधी वळवला आहे. निधीच्या बाबत अजितदादांनी शिंदेंना मागे टाकले आहे. अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी भाजपनंतर राष्ट्रवादीला झुकतं माप दिल्याची भावना शिवसेना मंत्र्यांच्या मनात आहे.

NCP gets second-highest funds
Satish Bhosale Khokya : फरार असलेल्या खोक्या व्हिडिओतून पहिल्यांदाच बोलला; पळून का गेला? सुरेश धसांशी नातं काय?

महायुतीत कुणाला किती निधी मिळाला?

  • भाजपला एकूण 89 हजार 128 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

  • महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा जास्त निधी मिळाला आहे.

  • अजितदादांच्या राष्ट्रवादीला एकूण 56 हजार 563 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

  • बजेटमध्ये सर्वात कमी निधी शिवसेनेकडील खात्यांना मिळाला आहे.

  • शिवसेनेला एकूण 41 हजार 606 कोटी 55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com