NCP mla Rohit Pawar slam bjp : भारतीय जनता पार्टीचा ४३ वा स्थापना दिवस (BJP foundation day) आज (गुरुवारी) देशभर साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना पवारांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका भाषणाची आठवण करुन देत भाजपला चिमटा काढला आहे.
रोहित पवारांनी टि्वट करीत भाजपला स्थापनादिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत, "सरकार येतील-जातील, पक्षांची स्थापना होईल-पक्ष संपतील.., पण देश राहिला पाहिजे. या देशात लोकशाही राहिली पाहिजे," असे वाजपेयी आपल्या एका भाषणात म्हटले होते. या भाषणांची आठवण रोहित पवारांनी आज भाजपला करुन दिली आहे.
"भाजपा येत्या काळात लोकशाही विचारांना जपण्याचा प्रयत्न करेल, ही अपेक्षा," अशा शब्दात रोहित पवारांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करीत भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं आहे. "आपला वैचारिक लढा हा कायम राहील परंतु लोकहितासाठी एकत्र येण्याची गरज असेल तिथं एक नागरिक म्हणून नक्कीच सहकार्य राहील," असा विश्वास त्यांनी टि्वटमधून व्यक्त केला आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणत केला. कार्यकर्त्यांना संघटीत आणि मजबूत होण्याचा मंत्र दिला. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर त्यांनी टीका केली. भविष्यातील योजनाही त्यांनी यावेळी सांगितल्या.
"आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमंताची जयंती साजरी करत आहेत. बजरंगबलीच्या नावाचा जयघोष सर्वत्र घुमत आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासात हनुमानजींचं जीवन आणि घटना आजही आपल्याला प्रेरणा देतात. महान शक्तीचे आशीर्वाद आपल्या यशामध्ये दिसून येतात," असे मोदी म्हणाले.
१९८४ रोजी लोकसभेच्या दोन जागा जिंकणारी पार्टी आज ३०० जागा जिंकून सत्तेत आहे. ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना झाली. तेव्हा सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे अखिल भारतीय विद्यार्थी(ABVP)परिषदेत सक्रिय होते. १९८७ मध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह हे दोन्ही नेते भाजपमध्ये सामील झाले . आज भाजपच्या वर्धापन दिनी मोदी, शाह आणि लाल कृष्ण आडवाणी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Edited By Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.