Haryana Assembly : हरियाणात ‘आप’ला बुस्टरडोस; काँग्रेस-भाजपचं गणित बिघडणार..?

Arvind Kejriwal on Haryana Vidhan Sabha News : हरियाणात निवडणुकीची रणधुमाळी रंगत आहे. पण काँग्रस- भाजपचे गणित कसे असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Arwind Kejriwal Haryana Vishan Sabha Election
Arwind Kejriwal Haryana Vishan Sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Haryana elections Arvind Kejriwal : 177 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना जामीन मिळाल्यामुळे आम आदमी पक्षाला नक्कीच बुस्टरडोस मिळाला आहे. 'आप'ने हरियाणातील विधानसभेतील 90 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता हरियाणात निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असल्याचे दिसत आहे. पण काँग्रस- भाजपचे गणित कसे असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हरियाणात (Haryana Vidhansabha Election) काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त आप हा प्रमुख पक्ष बनला आहे. दिल्लीला लागून असलेल्या या राज्यात आपचा चांगलाच प्रभाव आहे. 2019 मध्ये, AAP ने हरियाणा विधानसभेच्या 46 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यावेळी त्यांची मतांची टक्केवारी केवळ एक टक्का होती. मात्र आता 'आप'ची स्थिती बदलली आहे. प्रदीर्घ काळ भाजपचा बालेकिल्ला असलेली दिल्लीचे कमान विधिमंडळ पातळीवर तरी आपचा बालेकिल्ला बनली आहे.

Arwind Kejriwal Haryana Vishan Sabha Election
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल बाहेर येणार, पण CM जेलमध्येच; कोर्टाचा निकाल घ्या समजून...

काँग्रेस-भाजपवर किती परिणाम होईल?

तिकीट वाटपापूर्वीच हरियाणात काँग्रेस (Congress) वेगवेगळ्या गटांमध्ये लढत आहे. तर यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच गोंधळ पाहायला मिळत आहे. हरियाणात सध्या अनेक प्रकारचे मुद्दे समोर आले आहेत. विनय फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच जुलाना मतदारसंघातून विनेश फोगट यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

Arwind Kejriwal Haryana Vishan Sabha Election
Arvind Kejriwal News : केजरीवालांना 48 तासांत 6 धक्के; PA बडतर्फ, आता 15 एप्रिलकडे लक्ष

दरम्यान, भाजपने अनेक जुन्या नेत्यांना तिकीट दिले नाही. यामुळे हरियाणातील भाजपचे जुने आणि निष्ठावंत नेते मंडळी नाराज झाली आहे. यामध्ये देसातील सर्वाक श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचाही समावेश आहे. त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र, हरियाणा निवडणुकीत काँग्रेससमोर बरीच आव्हाने आहेत.

जेजेपी आणि आझाद समाज पक्ष युती अंतर्गत राज्यातील सर्व जागांवर लढत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जेजेपीला 13 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती, मात्र लोकसभा निवडणुकीत जेजेपीचा वाटा एक टक्क्यांहून कमी होऊन 0.87 वर आला होता. अशा स्थितीत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केजरीवाल 'आप'च्या (AAP) प्रचाराला उभारी देतील. केजरीवलांमुळे 'आप'च्या प्रचाराला वेग आला तर हरियाणातील निवडणूक यावेळी अधिक रंजक होतील यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com