Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मरगळ झटकून काँग्रेस हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत उतरले होते.एक्झिट पोलच्या आकडेवारीनेही काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या होत्या तर भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती.
पण निकालादिवशी काँग्रेसच्या (Congress) सगळं काही अगदी मनाविरुद्ध तर भाजपच्या मनासारखं घडत गेलं. काँग्रेसचं सत्तेत परतण्याचं स्वप्नं भंगलं. तर पंजाबमध्ये वनसाईड इलेक्शन मारलेल्या 'आप'चा हरियाणात मात्र धुव्वा उडाला.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी (ता.8) जाहीर झाले. या दोन्ही राज्यांपैकी जम्मू आणि काश्मीरमध्ये पदरी पराभव पडला असला तरी भाजपचा मतांचा टक्केवारी वाढली आहे.
दुसरीकडे हरियाणात सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यात भाजपला यश आले आहे.तिथे भाजपला 48 तर काँग्रेसला 37 जागांवर विजय मिळाला.
विशेष म्हणजे हरियाणात काँग्रेसनं शेतकर्यांचे मुद्दे, अग्निवीर योजना,कुस्तीपटूंचा यांसारख्या अनेक प्रश्नांवरुन भाजपविरोधात रान पेटवलं होतं.तसेच गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपविरोधात जनतेत नाराजीचा अंडर करंटही होता. प्रचंड आत्मविश्वासामुळेच काँग्रेसचं हरियाणात पानिपत झाल्याचं बोलले जात आहे.
पण भाजपनं मायक्रो लेव्हलला काम करत पुन्हा एकदा सत्ता खेचून आणली. काँग्रेसला 14 जागांवर निसटता पराभव स्विकारावा लागला. त्यात 5 जागांवर तर 'आप'मुळे (AAP) काँग्रेस पराभूत झाल्याचं समोर आलं आहे. तिथे काँग्रेसपेक्षा 'आप'च्या उमेदवाराने अधिक मतं मिळवली आहे .
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपची आघाडी होईल अशी चर्चा होती.पण जागावाटपावरुन फिस्कटल्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वबळावर लढले.तोच निर्णय काँग्रेससाठी घातक तर भाजपला फायदेशीर ठरला. हरियाणात असे अनेक मतदारसंघ आहेत, जिथे आपमुळे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.
या मतदारसंघात डबवली,दादरी,महेंद्रगड,असंध,सामलखा,उचाना कलान,कालका यांसारख्या मतदारसंघांचा समावेश आहे. भाजप उमेदवार देवेन्द्र चतर्भुज अत्री यांनी उचाना कलान मतदारसंघातून अवघ्या 32 मतांनी विजय मिळवला आहे. तर काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. हरियाणातील 19 जागांवरचा निसटता पराभवच काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर घेऊन गेला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.