पंजाबमध्ये आप'ला मोठा धक्का, आमदार रुपिंदर कौर रुबी यांचा राजीनामा

रुपिंदर कौर (Rupindar Kaur Ruby) काही काळापासून आम आदमी पार्टीसाठी (Aam Aadmi Party) सक्रिय नव्हत्या.
Rupindar Kaur ruby
Rupindar Kaur ruby
Published on
Updated on

पंजाब : पंजाबमधील (Panjab) आम आदमी पार्टीला (AAP) मोठा धक्का बसला आहे. भटिंडा ग्रामीणच्या आमदार रुपिंदर कौर रुबी (Rupinder Kaur Ruby) यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. रुपिंदर कौर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. रुपिंदर कौर पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर नशीब आजमावताना दिसू शकतात, अशा चर्चा पंजाबच्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

रुपिंदर कौर यांनी आम आदमी पक्षाला राजीनामा स्विकारण्याची विनंती केली आहे. "संयोजक अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान जी, मी आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत ​​आहे. माझा राजीनामा स्वीकारण्यात यावा,''असे ट्विट करत आपला राजीनामा स्विकारण्याची विनंती केली आहे.

Rupindar Kaur ruby
'तूटपुंज्या पगारात दिवाळी कशी साजरी होणार?'

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, रुपिंदर कौर काही काळापासून आम आदमी पार्टीसाठी सक्रिय नव्हत्या. इतकेच नव्हे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भटिंडा दौऱ्यातही रुपिंदर कौर सामील झाल्या नव्हत्या. याशिवाय पार्टीच्या पोस्टरमधून त्यांचे फोटो गायब होते. यावरून पक्ष आणि त्यांच्यात सर्व काही सुरळीत नसल्याचे दिसून येत होते.

दरम्यान, आम आदमी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर रुपिंदर कौर काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. आपचा राजीनामा देण्यापूर्वी रुपिंदर कौर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि प्रभारी हरीश चौधरी यांचीही भेट घेतली. रुपिंदर कौर येत्या काही दिवसांत काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भटिंडामध्ये भरघोस यश मिळाले. भटिंडातील तीन जागा जिंकण्यात पक्षाला यश आले. पण जगदेव सिंह आधीच आप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तर आता रुपिंदर कौर यांच्या राजीनाम्यामुळे भटिंडातील आम आदमी पक्षाची पकड कमकुवत होऊ शकते, असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com