'तूटपुंज्या पगारात दिवाळी कशी साजरी होणार?'

गहिवरलेल्या डोळ्याने सांगली एसटी आगारातील वाहक मीना जाधव यांनी प्रशासनाला सवाल केला आहे.
Carrier Meena Jadhav from Sangli ST Depot
Carrier Meena Jadhav from Sangli ST DepotSarkarnama

सांगली: सगळ्या जगाची दिवाळी (Diwali) घरात साजरी होत असताना, एसटी कर्मचाऱ्यांची (ST Employees) दिवाळी मात्र रस्त्यावर गेली आहे. सगळे दिवाळी साजरे करताना, एसटी कर्मचाऱ्यांना घरात दिवाळी साजरी करण्याऐवजी रस्त्यावर साजरी करावीशी का वाटली ? यामागचे भीषण वास्तव एसटी वाहक मीना जाधव (Meena Jadhav) यांच्याकडे पाहिले तर सहजपणे लक्षात येईल.

मीना संतोष जाधव गेल्या दहा वर्षांपासून सांगली एसटी आगारामध्ये (Sangli ST Depot) वाहक (Carrier) पदावर कार्यरत आहेत. एसटी संपाचे, आणि आपल्या मागण्यांवर ठाम असण्याची अनेक कारणे त्यांनी सांगितली आहेत. मीना जाधव यांच्या घरची आर्थिक स्थिती तशी बेताचीच आहे. त्यांचा नवरा संतोष जाधव यांचा रिक्षाचा व्यवसाय आहे. हे कुटुंब वारणाली येथे भाड्याच्या घरात राहते. त्यांना दोन मुलं आणि मीना जाधव यांच्या आई असा परिवार आहे.

Carrier Meena Jadhav from Sangli ST Depot
मलिकांनी सांगितलं, `समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच असंही कनेक्शन!`

मुलांचे शिक्षण, घरभाडे, आरोग्य आणि इतर गोष्टी असा ढीगभर खर्च, पण मीना जाधव यांच्या हातात येणारा तूटपुंजी पगार आणि पतीची जेमतेम कमाई, यामुळे घर खर्च भागवणे म्हणजे तारेवरची कसरतच असल्याचे मीना जाधव सांगतात. अनेकदा त्यांना एसटीची डबल ड्युटी करावी लागते. त्यामुळे कधी कधी 15 दिवस मुलांची भेट देखील मुश्किलीने होते, एवढं करूनही संसाराचा गाडा हाकण्यासाठी शिलाई मशीनवर कपडे देखील शिवावी लागतात.

तर, तूटपुंजा पगार आणि पतीची कमाईदेखील कमी पडत पडते, त्यामुळे उतार वयात माझी आईदेखील चार घरच्या स्वयंपाकाचे काम करून आमच्या संसारला हातभार लावते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. एसटीच्या तूटपुंज्या पगारात घरसंसारासह कधी औषध तर कधी मुलांच्या शिक्षणासाठी घेतल्या कर्जाचे हप्ते भरण्यात जातात, हे सांगताना त्यांना अश्रुही अनावर झाले होते.

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांना संप का करावा लागतो, हे सांगताना मीना जाधव सांगतात, ''एसटीचा पगारच खूप कमी आहे. यंदा तर फक्त अडीच हजार रुपये बोनस मिळाला. आता या अडीच हजार रुपयात दिवाळी कशी साजरी करायची? ते तुम्हीच सांगा, आमच्या घरात एवढ्या पगारात दिवाळी साजरी होऊ शकत नाही. त्यामुळे रस्त्यावर आल्या शिवाय आम्हाला पर्याय उरत नाही. त्यामुळे सरकारने आमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला पगार द्यावा. अशी कळकळीची मागणी मीना जाधव यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com