Swati Maliwal Case : केजरीवालांच्या घरातील व्हिडिओ व्हायरल; मालीवाल म्हणाल्या, राजकीय हिटमॅनने...

Bibhav Kumar News : विभव कुमार यांनी आपल्याला जबर मारहाण केल्याची तक्रार मालीवाल यांनी केली आहे. याप्रकरणी कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला आयोगानेही दखल घेतली आहे.
Bibhav Kumar, Arvind Kejriwal, Swati Maliwal
Bibhav Kumar, Arvind Kejriwal, Swati MaliwalSarkarnama

New Delhi News : आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal Case) यांना मारहाण झाल्याचे प्रकरण चांगलेच ऐरणीवर आले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे प्रकरण समोर आल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच आता केजरीवालांच्या घरातील मालीवाल यांचा एक कथित व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सुरक्षारक्षक आणि मालीवाल यांच्यातील संभाषण आहे. या व्हिडिओनंतर मालीवाल यांनी कुणाचेही नाव न घेता ‘राजकीय हिटमॅन’ असे संबोधन टीकास्त्र सोडले आहे.

केजरीवालांचे (Arvind Kejriwal) खासगी सचिव विभव कुमार (Bibhav Kumar) यांच्याविरोधात मालीवाल यांनी काल पोलिसांत (Police) तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यानंतर आज मालीवाल यांनी कोर्टात जाऊनही जबाब दिला. यादरम्यान मालीवाल यांचा केजरीवालांच्या घरातील एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या घरातील सुरक्षारक्षकांशी बोलत असल्याचे दिसते. (Latest Political News)

Bibhav Kumar, Arvind Kejriwal, Swati Maliwal
PM Narendra Modi : गाझावरील हल्ला थांबवण्यासाठी इस्त्रायलला विशेष दूत पाठवला! मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मालीवाल यांनी एक्सवरून निशाणा साधला आहे. राजकीय हिटमॅनने (Political Hitman) स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची टीका त्यांनी केली आहे. यामध्ये त्यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांचा नेमका निशाणा कुणावर आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणावर केजरीवालांनी अद्याप एक शब्दही उच्चारलेला नाही. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणतात मालीवाल?

नेहमीप्रमाणे यावेळीही राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या लोकांकडून ट्विट करायला सांगत कोणताही संदर्भ नसलेला व्हिडिओ चालवला जात आहे. यामुळे केलेल्या गुन्ह्यातूनआपण वाचू, असे त्याला वाटत आहे. एखाद्याला मारत असल्याचा व्हिडिओ कुणी बनवेल का? घरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून सत्य सर्वांसमोर येईल. कितीही खालच्या पातळीवर गेला तरी देव सगळं पाहतोय. एक ना एक दिवस सगळ्यांचे सत्य जगासमोर येईल, असे ट्विट मालीवाल यांनी केले आहे.

काय आहे 'एफआयआर'मध्ये?

मी काहीही केलेले नसताना त्याने मला मारायला सुरूवात केली. मला कमीत कमी सात-आठ वेळा थोबाडीत मारली. मी मदतीसाठी ओरड होते. मी त्याला पायाने दूर लोटले. तो पुन्हा मला मारायला लागला. माझा शर्ट ओढला. माझे डोके पकडून टेबलवर आपटले. मी वाचण्याचा प्रयत्न करत होते आणि तो पायाने माझ्या पोटात, छातीवर लाथा घालत होता. मी कशीतरी सुटका करून ड्रॉईंग रुममध्ये आले आणि सोफ्यावर बसले. मला खूप मोठा धक्का बसला होता म्हणून मी 112 क्रमांकावर कॉल करून घटनेची माहिती दिली, असे 'एफआयआर'मध्ये म्हटले आहे.

Bibhav Kumar, Arvind Kejriwal, Swati Maliwal
Swati Maliwal Case : …त्यावेळी केजरीवालांच्या घरी काय झाले? मारपीट कशी झाली? मालीवाल यांनीच दिली माहिती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com