New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमारांच्या (Bibhav Kumar News) अडचणी वाढणार आहेत. आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने विभव यांना नोटीस पाठवून 17 मेला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांचे एक पथक मालीवाल यांचा जबाब घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. केजरीवालांनी मात्र या प्रकरणावर अद्याप एकदाही भाष्य केलेले नसल्याने विभव कुमार यांच्यावर केजरीवाल कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
विभव कुमार हे केजरीवालांचे (Arvind Kejriwal) अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यामुळे मालीवाल प्रकरणाला महत्व प्राप्त झाले आहे. अर्थात मालीवाल (Swati Maliwal) या आपच्या खासदार असून दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षही आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनामुळे सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. आपचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांनीही विभव कुमार यांच्यावर केजरीवाल कारवाई करतील, असे म्हटले आहे. (Latest Political News)
कोण आहेत विभव कुमार?
विभव कुमार आणि केजरीवालांची मैत्री खूप जुनी आहे. द प्रिंटच्या वृत्तानुसार, विभव कुमार आमि केजरीवाल काही वर्षांपासून एकत्रित काम करत आहेत. विभव हे व्हिडिओ जर्नालिस्ट होते. ‘इंडिया अगेन्स करप्शन’ कडून एक नियतकालिक प्रकाशित केले जात होते. त्यासाठी विभव व्हिडिओ एडिटिंगचे काम करायचे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भ्रष्टाचाराविरोधात देशात 2011 मध्ये झालेल्या मोठ्या आंदोलनात ‘इंडिया अगेन्स करप्शन’ या संस्थेचा सक्रीय सहभाग होता. तेव्हापासून विभव आणि केजरीवाल यांची मैत्री आहे. 2015 मध्ये केजरीवालांचे खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2020 आपची दुसऱ्यांदा सत्ता आल्यानंतरही त्यांना हेच पद देण्यात आले.
केजरीवालांचे रोजच्या कार्यक्रमांचे संपूर्ण नियोजन विभव यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांना केजरीवालांचा उजवा हात म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नियुक्तीपासून ते चर्चेत आहेत. मागील महिन्यांत व्हिजिलन्स विभागाने त्यांची नियुक्ती रद्द केली होती. कथित मद्य धोरण घोटाळ्यातही त्यांची जबाब घेण्यात आला आहे.
केजरीवालांनी जेलमध्ये असताना पाच लोकांची नावे भेटण्यासाठी जेल प्रशासनाला दिली होती. त्यामध्ये विभव यांचेही नाव होते. मालीवाल यांच्या गैरवर्तनानंतर विभव गुरूवारी पहिल्यांदाच केजरीवाल यांच्यासोबत दिसून आले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. आज एका पत्रकार परिषदेत मालीवाल यांच्याविषयी विचारल्यानंतर केजरीवालांनी एकही शब्द न बोलल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.