AAP Leader Raghav Chadha: 'आप'चे खासदार राघव चढ्ढा यांचा राज्यसभेत मिश्किल अंदाज!

Raghav Chadha Video : विशेष म्हणजे थोडसं नटखटपणा करण्याचाही सवलत दिली जाते.
Raghav chaddha
Raghav chaddhaSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस असून, यावेळी आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांचा राज्यसभेत मिश्किल अंदाज पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी राज्यसभेचे नवनिर्वाचित सभापती जगदीप धनखड यांचे अभिनंदन करताना मिश्किल अंदाज पाहायला मिळाला.

Raghav chaddha
Sachin Ahir News: ज्यांना पोल्ट्री उभी करता आली नाही, त्यांनी पतसंस्थांची बदनामी थांबवावी...

यावेळी राज्यसभेचे अध्यक्ष यांच्या अभिनंदनपर भाषण करताना चढ्ढा म्हणाले की, "मी आपलं आमच्या पक्षातर्फे, आमचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यातर्फे तुमचं खूप अभिनंदन करतो. तुमच्या नव्या कारकीर्दीसाठी अनेक शुभेच्छा देतो. तुमचा प्रवास खूपच उत्कृष्ट राहिला आहे. साधरण शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतल्यानंतर तुम्ही अनेक संघर्षांचा सामना केला. खासदार, मंत्री, राज्यपाल आणि आता देशाचे उपराष्ट्रपती म्हणून तुम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाली.

Raghav chaddha
CM Bhagwant Mann on BJP: दिल्लीत सत्ता मिळताच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले...

मी एका कृषिप्रधान भागाचं प्रतिनिधित्व करतो. तुम्ही एका शेतकरी कुटुंबातून आला आहात, म्हणून या सभागृहात शेतीचे प्रश्न प्राधान्याने उपस्थित केले जाईल. शेतकरांच्या हक्क आणि अधिकारांच्या गोष्टी केल्या जातील. आपण या सभागृहाचे सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहात आणि मी या सभागृहाचा वयाने सर्वात लहान असलेला सदस्य आहे, असे चढढा म्हणाले.

जो कुटुंबाचा सर्वात मोठा सदस्य असतो, ती व्यक्ती सर्वात लहान सदस्याचा विशेष ध्यान ठेवते. त्याच्यावर जास्त प्रेम करते. लहान व्यक्तीला जास्तीचं हस्तक्षेप करण्याची संधी देते. त्याचे झीरो अवर जास्त निवडले जातात. त्याचे स्टार प्रश्न जास्त लागतात. आणि विशेष म्हणजे त्याला थोडसं नटखटपणा करण्याचाही सवलत दिली जाते. मी ही अपेक्षा करतो की, आपलं विशेष प्रेम मला मिळेल. विशेष स्नेह माझ्यासारख्या तरूण सदस्याला मिळेल, असे चढ्ढा म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com