मंचर : “ राज्यात सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील युवक-युवतींनी शेतीपूरक उद्योग व्यवसाय उभारले आहेत. ग्रामीण विकासात पतसंस्थांचे फार मोठे योगदान आहे. ज्यांना सहकारी तत्वावर पोल्ट्री उभी करता आली नाही. त्यांनी पतसंस्थांची बदनामी करण्याचे कामं थांबवावे. सर्व सहकारी पतसंस्थांच्या मागे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खंबीरपणे उभा राहील,” अशी ग्वाही शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर यांनी दिली.
अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथे बुधवारी (ता.७) झालेल्या पत्रकार परिषदेत आहिर बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेश भोर, मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे,अरुण बाणखेले, मल्हारी अभंग उपस्थित होते. (Sachin Ahir, Suresh Bhor Latest News)
भाजपचे (BJP) प्रवक्ते किरीट सोमय्या (Kirit Siomaiya) यांनी राज्यातील सहकारी पतसंस्था आर्थिक घोटाळे करतात. सहकार खात्याने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी सोमवारी (ता.५ डिसेंबर) अवसरी फाटा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती. या पार्श्वभूमीवर अहिर (Sachin Ahir) यांनी सोमय्या यांचा नामउल्लेख टाळून सहकार क्षेत्र उध्वस्त करण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टीका केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनीच पतसंस्था उभ्या केल्या आहेत. शेतमजूर, कष्टकरी, सफाई कामगार यांनी ठेवी रूपाने पतसंस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे. वस्तूस्थिती समजून न घेता केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे.”
“आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या स्वबळावर लढायच्या की, महाविकास आघाडीसोबत लढायच्या याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार दिले आहेत. आंबेगाव तालुक्यात राजाराम बाणखेले व दत्ता गांजाळे यांच्यात असलेल्या वादंगाचा विषय उपस्थित केल्यानंतर अहिर म्हणाले, तसे काही मला वाटत नाही. पण येथील सर्व कार्यकर्त्यांची एकजूट पाहावयास मिळेल”,असेही आहिर म्हणाले.
दरम्यान, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात दररोज बिबट्याचे हल्ले सुरु आहेत. माणिकडोह बिबट निवारण केंद्राची क्षमता वाढवावी. या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा मिळावा. या मागणीचा पाठपुरावा नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात करणार आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी शिवसेनेच्या वतीने गुरुवारी (ता.१५ डिसेंबर) मंचर येथे शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असेही अहिर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.