चंदीगड : पंजाबमध्ये (Punjab) पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. काँग्रेसने मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलून चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना मुख्यमंत्री बनले आहे. आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरली आहे. पंजाबमध्ये मुख्य लढत ही आप आणि काँग्रेसमध्येच (Congress) असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, एबीपी न्यूज आणि सी व्होटर यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये आप या राज्यात सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. आपला 52 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. अकाली दलाला 17 ते 23 आणि भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्षही भाजपसोबत युती करून निवडणुकीत काट्याची टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत राज्यातील जनता कोणाला संधी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यातील 6 टक्के जनतेने अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहे. सुखबीर सिंह बादल यांना 15 टक्के, अरविंद केजरीवाल यांना 17 टक्के आणि चरणजीत सिंह चन्नी 29 टक्के, नवज्योत सिंह सिद्धू 6 टक्के तर भगवंत मान यांना 23 टक्के व इतरांना 4 टक्के मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसणार असल्याचे दिसत आहे.
पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड कोणाला?
चरणजितसिंह चन्नी 29 टक्के
भगवंत मान 23 टक्के
अरविंद केजरीवाल 17 टक्के
सुखबीरसिंह बादल 15 टक्के
कॅप्टन अमरिंदरसिंह 6 टक्के
नवज्योतसिंह सिद्धू 6 टक्के
इतर 4 टक्के
दोआबा प्रदेश -
दोआबा क्षेत्रातील एकूण 23 विधानसभेच्या जागा आहेत. जागांपैकी काँग्रेसला 7 ते 11 जागा मिळू शकतात. तर आम आदमी पार्टीला 7 ते 11 जागा मिळतील असा अंदाज आहे. अकाली दलाला 2 ते 6 जागा मिळू शकतात. तर भाजपच्या वाट्याला एका येत असल्याचे सांगितले आहे.
मांझा प्रदेश -
मांझा विभागात विधानसभेच्या एकूण 25 जागा आहेत. काँग्रेसला मांझा प्रदेशातून 14 ते 18 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्षाला 3 ते 7, अकाली दलाला 2 ते 6 जागा, तर भाजपला येथेही एका जागेवर समाधान मानावे लागेल.
माळवा प्रदेश -
माळवा प्रदेशात एकूण 69 जागा आहेत. त्यामुळे सत्तेची चाबी याच प्रदेशाच्या हातात आहे. माळवा भागात काँग्रेसला 13 ते 17 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्ष माळवा भागात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते 39 ते 43 जागा जिंकू शकतात. अकाली दलाला 10 ते 14 जागा, भाजपला 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
सध्या कोणत्या पक्षाला किती जागा आहेत.
पंजाबमध्ये एकूण 117 जागा आहेत.
काँग्रेस - 77
भाजप - 3
आम आमदमी पार्टी- 20
अकाली दलाला - 15
इतर - २
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.