अच्छे दिन! पेट्रोलपेक्षा आता बिअर झाली स्वस्त

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
Petrol and Diesel prices
Petrol and Diesel prices File Photo

मुंबई : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता विमान इंधनापेक्षा (Aviation Turbine Fuel) पेट्रोल 33 टक्क्यांनी महाग झाले आहे. पेट्रोलच्या दरात 28 सप्टेंबरपासून 21 वेळा आणि डिझेलच्या दरात 24 सप्टेंबरपासून 24 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. आता पेट्रोलपेक्षा बिअर स्वस्त झाल्याचा टोला ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shtarughan Sinha) यांनी लगावला आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरुन इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर भाजपला टोला लगावला आहे. अनेक दशकांनंतर पेट्रोलपेक्षा बिअर स्वस्त झाली आहे. यामुळे आता नवीन घोषणा आली आहे. केवळ प्या पण गाडी चालवू नका, अशी घोषणा आहे, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्हा हे आधी भाजपमध्ये होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय आरोग्यमंत्री होते. नंतर पक्ष नेतृत्वाशी न जमल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

सिन्हा यांच्या या ट्विटवर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याची बाजू घेत ट्विट केले होते. यावरुन काही जणांनी शत्रुघ्न सिन्हांना बॉलीवूडमधील अमली पदार्थांच्या सेवनाबाबत जाब विचारला आहे. काही जणांनी बिअर पिल्यानंतर गाडीची काय गरज आपली 11 नंबरची गाडी आहे, अशी विनोदी प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.

Petrol and Diesel prices
समीर वानखेडेंना दणका! एनसीबीकडून खात्यांतर्गत चौकशी सुरू

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळी आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे. आगामी काळात हे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. सलग पाच दिवस झालेल्या वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आज बदललेले नाहीत. पेट्रोलच्या दरात 28 सप्टेंबरपासून 21 वेळा म्हणजेच एकूण 6.4 रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात 24 सप्टेंबरपासून 24 वेळा वाढ म्हणजेच एकूण 7.7 रुपयांची वाढ झाली आहे.

Petrol and Diesel prices
मोठी घडामोड : एनसीबीनं तातडीनं समीर वानखेडेंना दिल्लीत बोलावलं

देशात पेट्रोलचा दर विमान इंधनापेक्षा 33 टक्के जास्त आहे. विमान कंपन्यांना ज्या दरात इंधन विकले जाते त्यापेक्षा 33 टक्के जास्त दराने वाहनचालक पेट्रोलची खरेदी करीत आहेत. विमान इंधनाचा दर दिल्लीत प्रतिकिलोलीटर 79 हजार 20 रुपये म्हणजेच 79 रुपये लिटर आहे. यामुळे देशात आता विमान चालवण्यापेक्षा वाहन चालवणे महाग झाल्याची टीका होत आहे. देशात 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची निकाल लागल्यानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू झाली होती. देशभरात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपयांची वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com