Nirmala Sitharaman News: लोकांनीच विरोधकांवर दोनदा अविश्वास ठराव आणला; सीतारामनांचा घणाघात

Nirmala Sitharaman On No-Confidence Motion: पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार? संसदेकडे देशाचं लक्ष
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आणणलेल्या अविश्वास ठरावावर तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वातील 'यूपीए' सरकारने देशाचे एक दशक वाया घालवले. परिणामी लोकांनीच विरोधकांच्या विरोधात २०१४ आणि २०१९ मध्ये अविश्वासाचा ठराव मंजूर करून त्यांना सत्तेपासून दूर ठेवले, असा घणाघात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी केला. (Latest Political News)

पंतप्रधान मोदी संसदेत आज अविश्वास ठरावाला उत्तर देणार असून याकडे देशाचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी सीतारामन यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा तीव्र शब्दात समाचार घेतला. यानंतर काँग्रेस, द्रमुक, तृणमूल आणि डाव्या पक्षांनी अर्थमंत्र्यांवर लोकसभेची दिशाभूल केल्याचा आरोप करत सभात्याग केला. लोकसभेत सुरू असलेल्या एनडीए आणि इंडियातील खडाजंगीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Nirmala Sitharaman
Kolhapur-Satara Politics: राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापूर, सातारा लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलणार?

सीतारामन म्हणाल्या, "आता यूपीएकडे कोणतीही विश्वासार्हता नाही. यूपीए म्हटले की लोकांना भ्रष्टाचार आणि गुंडगिरीची आठवण होत असल्यानेच विरोधी पक्षांनी त्यांच्या आघाडीसाठी 'इंडिया' नाव निवडले आहे." आघाडीतील पक्ष विविध राज्यात कसे एकमेकांच्या विरोधात लढतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सीतारामन यांनी सांगितले, "ही एक विचित्र भागीदारी आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप विरोधात लढत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, डावे आणि काँग्रेस लढत आहेत. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस लढते. जम्मू आणि काँग्रेसमध्ये, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांची लढाई आहे."

Nirmala Sitharaman
Aaditya vs Amit Thackeray: आदित्य-अमित भिडणार; मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंचा कस लागणार

विरोधकांवर हल्लाबोल करताना सीतारामन यांनी जयललिता यांची आठवण सांगून द्रमुकचाही समाचार घेतला. त्यांनी सांगितले, १९८९ मध्ये तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांची साडी ओढली गेली आणि द्रमुकचे सदस्य त्यांच्यावर हसले होते. यानंतर जयललितांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरच विधानसभेत परत येण्याची शपथ घेतली होती. त्यानुसार त्या दोन वर्षांनंतर मुख्यमंत्री म्हणूनच परतल्या होत्या."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com