JNU : जेएनयूमधील 'त्या' घटनेची चौकशी होणार

जेएनयू विद्यापीठाच्या भिंतींवर विविध जातींच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या...
JNU
JNUSarkarnama
Published on
Updated on

JNU News : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) परिसरातील अनेक भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य जातींच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जेएनयूमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची तात्काळ दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Jawaharlal Nehru University News)

जेएनयूच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास विभागाच्या (स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज) इमारतीच्या भिंतीवर काही जातींच्या विरोधातील घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. यामध्ये नलिन कुमार मोहपात्रा, राज यादव, प्रवेश कुमार आणि वंदना मिश्रा या प्राध्यापकांच्या केबिनवर ‘शाखेत परत जा’ अशा घोषणा कलर स्प्रेने लिहिण्यात आल्यात.

JNU
Sanjay Raut : कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर थुंकतोय; संजय राऊतांची शिंदे सरकारवर टीका

दरम्यान, या घटनेचा जेएनयू प्रशासनाने निषेध केला आहे. संबंधित विभागाला या प्रकाराची चौकशी करून त्वरित अहवाल देण्याचे निर्देश कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी दिलेत. तर याबाबत जेएनयूने (JNU) जारी केलेल्या निवेदनात म्हटले, 'जेएनयू म्हणजे समावेश आणि समानता आहे. या आवारातील अशा कोणत्याही प्रकारचे हिंसाचारी कृत्य सहन केले जाणार नाही, तसेच अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत', असं जेएनयू प्रशासनाने सांगितलं आहे.

JNU
Vidarbha : आता सुरू झाला पूर्व विदर्भ विरूद्ध पश्‍चिम विदर्भाचा वाद...

भिंतीवर नेमकं काय लिहिलं आहे?

'शाखेत परत जा', 'आम्ही बदला घेऊ', 'आम्ही तुमच्यासाठी येत आहोत', 'ब्राह्मण आणि बनिया परिसर सोडा', 'रक्तपात होणार' अशा प्रकारच्या घोषणा इमारतीच्या भिंतीवर तसेच काही दरवाजांवर लिहिण्यात आल्यात. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून तक्रार समितीला चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. (JNU News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com