Adv. A.P.Singh : 'निर्भया', 'हाथरस'च्या गुन्हेगारांची बाजू मांडणारे वकील आता कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीचीही केस लढवणार?

Adv. A.P.Singh and Kolkata Rape Case Accused Sanjay Roy : 'विचार करणार पण एक अट आहे...' जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत, प्रसिद्ध अ‍ॅड. एपी सिंह
Adv. A.P.Singh
Adv. A.P.SinghSarakarnama
Published on
Updated on

Kolkata Rape Case Update : कोलकात आरजी कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी संजय रॉय याच्या बाजूने कोणताही वकील केस लढण्यास तयार नाही. अशावेळी सर्वोच्च न्यायालयाचे वकील अजय प्रकाश सिंह कोलकाता केसमधील आरोपी संजय रॉयची केस लढू शकतात अशी माहिती समोर येत आहे.

कारण, एका वृत्तवाहिनीशी बोलताना एपी सिंह यांनी म्हटले की, जर संजय रॉयकडून माझ्याशी संपर्क साधला गेला, तर मी न्यायालयात त्याची बाजू मांडण्यास तयार होवू शकतो.

एपी सिंह हे 2012मधील निर्भया प्रकरणात आणि 2020मधील हाथरस गँगरेप(Hathras gangrape) प्रकरणातील आरोपींच्या बाजून केस लढलेले आहेत. त्यांनी पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर आणि मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या हाथरस चेंगराचेंगरीत 121 जणांच्या मृत्यू प्रकरणात ‘भोले बाबा’ची बाजू मांडण्यासाठी उभा राहिले होते.

विशेष म्हणजे निर्भया प्रकरणातील आरोपीची बाजू मांडल्याबद्दल एपी सिंह यांना अन्य वकिलांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले होते. एपी सिंह यांचे निर्भया प्रकरणातील एक विधान वादग्रस्त ठरले होते, ज्यामध्ये त्यांनी निर्भयाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला होता.

Adv. A.P.Singh
Punishment in Rape Cases : कोलकातामधील बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी अन्य देशांमध्ये आहेत भयंकर शिक्षा!

एपी सिंह लढणार आरोपी संजय रॉयची केस? -

एपी सिंह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोलकाताच्या आरजी कर रुग्णालयातील महिला डॉक्टरबाबत तर काही विधान केलं नाही. परंतु त्यांनी हे म्हटलं की आरोपीलाही वकील लावण्याचा अधिकार आहे. तसेच संजय रॉयची केस लढणार का? या प्रश्नावर उत्तर देताना एपी सिंह म्हणाले, नाही आता नाही. पुढाकार घेवून मी का लढू. आधी लोक येतील. त्याचे कुटुंबीय येतील व भेटतील आणि सांगतील तेव्हा तेव्हाचं बघू. जर कुटुंबीयांनी संपर्क साधला तर मग विचार करू.

Adv. A.P.Singh
Sukhendu Shekhar Roy : कोलकाता बलात्कार अन् हत्या प्रकरणात आता तृणमूल खासदार सुखेंदु शेखर रॉय यांना समन्स!

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले एपी सिंह मागील काही वर्षांमध्ये देशातील अनेक चर्चित खटल्यांमध्ये वकिली करताना दिसले आहेत. एपी सिंह यांचे युक्तिवाद दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत चर्चेचे विषय ठरले आहेत. याशिवाय न्यायालयाबाहेरही एपी सिंह यांची काही विधान वादग्रस्त ठरलेली आहे. मात्र एपी सिंह यांच्याकडे एकदा जर कोणी गेलं तर ते गरजवंतांसाठी नेहमीच उभा राहिलेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com