Punishment in Rape Cases : कोलकातामधील बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी अन्य देशांमध्ये आहेत भयंकर शिक्षा!

Punishment for Rape In in various countries : जाणून घ्या, अमेरिका, इराक, रशिया, पाकिस्तान, नॉर्थ कोरियामध्ये काय आहेत कायदे?
Rape Case Nasik police academy
Rape Case Nasik police academysarkarnama
Published on
Updated on

Kolkata Rape Case and Punishment : कोलकाता आरजी मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाने अवघा देश हादरला. रस्त्यापासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वच स्तरावरून लोक आपल्या संतप्त भावना व्यक्त करत असून, कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

मात्र अशा घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या गुन्ह्यांमधील आरोपींसाठी विविध प्रकारच्या शिक्षेची भारतामध्ये तरतूद आहे. यामध्ये बलात्कार प्रकरणातील दोषीला फाशी, जन्मठेप अशा शिक्षाही सुनावल्या जातात. याचा पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यांसाठी अन्य देशांमध्ये काय शिक्षा आहेत, ते जाणून घेऊयात.

नॉर्थ कोरिया आपल्या कठोर कायद्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बलात्काराच्या घटनेतील आरोपीला थेट गोळी मारून ठार केले जाते. या ठिकाणी जन्मठेप किंवा काह वर्षे कारावास या शिक्षा नाहीत. तर सौदी अरबमध्ये अशा गुन्ह्यासांठी भयानक शिक्षा आहे, जर असा गुन्हेगार आढळला तर त्याला जनतेसमोर आणून त्याचा शिरच्छेद केला जातो. चीनमध्येही बलात्कार करणाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते, याशिवाय अनेक प्रकरणांमध्ये आरोपीचं गुप्तांग कापलं जातं.

Rape Case Nasik police academy
Rahul Gandhi News : 'पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहारनंतर आता महाराष्ट्रातही..' ; बदलापूरच्या घटनेवर राहुल गांधींचा संताप!

याशिवाय नेदरलँडबाबत बोलायचं झालं तर जर कोणी अशाप्रकारचे दुष्कृत्य केलंच तर त्याला चार ते १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास होवू शकतो. इराकमध्ये बलात्काराच्या घटनेतील दोषीला दगडं मारले जातात. या ठिकाणी दोषीला तोपर्यंत दगडं मारले जातात जोपर्यंत तो मरत नाही.

अमेरिकेच्या फेडेरल लॉमध्ये बलात्कार किंवा रेप या शब्दाचा वापर नाही. तेथील कायदा विना समंती लैंगिक कृत्ये करण्यास अपराध ठरवतो. यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. क्रिमिनल कोड ऑफ रशियाच्या कलम 131नुसार बलात्काराच्या प्रकरणातील दोषीला जास्तीत जास्त ३० वर्षे शिक्षा सुनावली जाते आणि ही शिक्षा गुन्ह्याच्या गंभीरतेवर अवलंबून असते. पाकिस्तानातही अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मृत्यूदंड ते कठोरातील कठोर शिक्षा सुनावली जाते.

Rape Case Nasik police academy
Bharat Bandh : आंदोलकांना पांगवण्यासाठी फिल्डवर आलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांवरच पोलिसांचा लाठीचार्ज, घटनेचा VIDEO व्हायरल

भारतात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा? -

आयपीसी कलम 376 अंतर्गत बलात्कार प्रकरणात दोषी आढळल्यास दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बीएनएसच्या कलम 64 मध्येही हीच शिक्षा नमूद आहे. आयीपीसीमध्ये कलम 375 मध्ये बलात्काची व्याख्या करण्यात आली आहे. तर कलम 376मध्ये यासाठीच्या शिक्षेची तरतूद आहे. तर बीएनएसमध्ये कलम 63मध्ये बलात्काराची व्याख्या दिलेली आहे आणि 64 ते 70 मध्ये शिक्षेची तरतूद आहे.

याशिवाय, बीएनएसमध्ये अल्पवयीनांवर बलात्कार प्रकरणात कठोर शिक्षा सुनावली गेली आहे. सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षे शिक्षेची तरतूद आहे. ही शिक्षा जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत वाढवली जाऊ शकते. या शिक्षेत दोषीला संपूर्ण आयुष्य तुरुंगातच काढावे लागते.

पॉक्सो म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअळ ऑफेन्स अॅक्ट. हा कायदा 2012 मध्ये आणला गेला. हा मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी निगडीत आहे. हा कायदा अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले किंवा मुली यांच्यावरील अत्याचारासाठी लागू होतो. या कायद्यातून आरोपीची सुटका शक्य नसते. जन्मठेप ते फाशीपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com