Narendra Modi And Canada PM
Narendra Modi And Canada PMSarkarnama

India Vs Canada : भारत - कॅनडामध्ये तणाव ? केंद्र सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायझरी; कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना

Indian Government Advisory On Canada : कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून अ‍ॅडव्हायझरी जारी
Published on

Delhi News : भारत आणि कॅनडामध्ये आता चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाने भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर भारतानेदेखील अॅक्शन घेत कॅनडाच्या राजदूताची भारतातून हकालपट्टी केली. त्यानंतर आता कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी केंद्र सरकारकडून अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे.

खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाने केला होता. त्यानंतर कॅनडा सरकारने भारतीय राजदूतांना हटवलं होतं. यानंतर भारतानेही कॅनडाच्या राजदूताला हटवलं. आता भारताने कॅनडात राहणाऱ्या भारतीयांसाठी अ‍ॅडव्हायझरी जारी करत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Narendra Modi And Canada PM
India Vs Canada : भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; राजदूताची केली थेट हकालपट्टी

भारताने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटलं आहे की, कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांनी तुम्हाला ज्या भागात लक्ष्य केले जाऊ शकते, त्या भागात जाणे टाळा. कॅनडात भारतीय समुदायाच्या लोकांवर हल्ले झाल्याच्या घटना ज्या ठिकाणी घडल्या, त्या ठिकाणी भारतीयांनी जाणे टाळा.

तसेच कॅनडातील भारतीय नागरिकांनी सावध राहावे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कॅनडातील भारताची दूतावास कार्यालये त्यांच्या संपर्कात राहतील, असे जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये सांगण्यात आले आहे.

दरम्यान, भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता तुर्कीनेदेखील भारताविरोधात भूमिका घेतली आहे. तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७८ व्या संमेलनात जम्मू-काश्मीरबाबत चिंता व्यक्त केली. तसेच तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने मत व्यक्त केले. त्यामुळे आता कॅनडानंतर तुर्कीनेही भारताविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Narendra Modi And Canada PM
Supriya Sule On Ajit Pawar : अमित शाहांचं कौतुक, अजितदादांना टोमणा, तर फडणवीसांवर टीका; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com