India Vs Canada : भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; राजदूताची केली थेट हकालपट्टी

India expelled Canadian diplomat in India : कॅनडा सरकारने भारतीय राजदूतांना हटवलं होतं. यानंतर आता भारत सरकारनेदेखील तातडीने अॅक्शन घेतली.
 Narendra Modi And Canada PM
Narendra Modi And Canada PMSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भारत आणि कॅनडामध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला असून, कॅनडाने भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर आता भारतानेदेखील जशास तसे प्रत्युत्तर देत कॅनडाच्या राजदूताची भारतातून हकालपट्टी केली आहे. कॅनडाच्या एका वरिष्ठ राजदूताला पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत चालले आहेत. यातच खलिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आराेप कॅनडा सरकारने केला होता. त्यानंतर कॅनडा सरकारने भारतीय राजदूतांना हटवलं होतं. यानंतर आता भारत सरकारनेदेखील तातडीने अॅक्शन घेत कॅनडाच्या वरिष्ठ राजदूताला हटवलं आहे.

 Narendra Modi And Canada PM
Women Reservation Bill : मोदी सरकारच्या महिला आरक्षणात एससी-एसटी-ओबीसींना स्थान आहे का? वाचा सविस्तर...

कॅनडाने भारतीय राजदूतावर केलेल्या कारवाईनंतर भारतानेही कडक शब्दांत कॅनडा सरकारला सुनावलं. तसेच पाच दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. याबरोबरच कॅनडाच्या राजदूताने भारताच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर आता भारतानेदेखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत कॅनडाच्या राजदूताला पाच दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

 Narendra Modi And Canada PM
Narendra Modi In Central Hall : नरेंद्र मोदींनी घेतला नव्या भारताचा वेध; जगात टॉप राहण्यासाठी 'या' क्षेत्रांवर भर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com