सरकारची मोठी घोषणा अन् त्यानंतर 24 तासांतच राणेंना आजीवन कॅबिनेटचा दर्जा बहाल

राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Pratapsingh Rane
Pratapsingh Rane Sarkarnama
Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीआधी (Goa Assembly Election) काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील भाजप (BJP) सरकारने घेतलेल्या या निर्णयाची केवळ 24 तासांतच अंमबजावणी झाल्याची बाब आता समोर आली आहे. राणेंना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीच केली होती.

माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रतापसिंग राणेंच्या कॅबिनेट दर्जाची माहिती आयरीश रॉड्रिग्ज यांनी मागितली होती. सरकारी नोंदीनुसार राज्य सरकारने 6 जानेवारीला राणेंना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे जाहीर केले होते. हा प्रस्ताव विविध खात्यांकडून मंजूर होताच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 7 जानेवारीला दुपारी याचे गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले. विशेष म्हणजे, यानंतर दुसऱ्याच दिवशी 8 जानेवारीला गोव्यात आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सरकारने घाईघाईने राणेंना कॅबिनेट दर्जा दिला.

याबाबत रॉड्रिग्ज यांनी 2 मार्चला गोव्याच्या मुख्य सचिवांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. राणेंचा आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा अवैध असून तो तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच याला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावाही रॉड्रिग्ज यांनी केला होता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारने राजकीय फायद्यासाठी राणेंना हा दर्जा दिला आहे. करदात्यांच्या पैशातूनच राणेंना आजीवन मानधन दिले जाणार असल्याने हा सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोपही रॉड्रिग्ज यांनी केला आहे.

राणेंनी त्यांचे पुत्र भाजप नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. नंतर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. विश्वजित राणे आणि त्यांच्या पत्नी या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राणेंना माघार घेतल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील थेट लढत टळली होती. यामागे राणेंना भाजप सरकारने आजन्म कॅबिनेट दर्जा दिल्याचे कारणही असल्याची चर्चा सुरू होती. आता माहिती अधिकारात याबद्दल वेगळीच माहिती समोर आली आहे.

Pratapsingh Rane
'काश्मीर फाईल्स'च्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; भाजपच्या मित्रपक्षानेच टाकला बॉम्ब

राणेंना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, आमच्या सरकारने ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना आजन्म मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी महत्वाची पदे भूषवली आहेत. गोव्यातील सर्व स्तरातील जनतेला ते कायम प्रेरणादायी ठरले आहेत. राज्य आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करीत असताना कायम त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आवश्यकता आहे. भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

Pratapsingh Rane
आधी कोल्हापूर उत्तरची रंगीत तालीम अन् नंतर करुणा विरुद्ध धनंजय मुंडे अशीच थेट लढत!

राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलत राणे यांना पर्ये मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी राणेंना निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. प्रतापसिंह राणे हे 82 वर्षांचे असून, ते 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. अखेर राणेंचे पुत्र विश्वजित आणि त्यांच्या स्नुषा विधानसभेवर निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com