The Kashmir Files
The Kashmir Files Sarkarnama

'काश्मीर फाईल्स'च्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध; भाजपच्या मित्रपक्षानेच टाकला बॉम्ब

पंतप्रधान मोदींसह भाजप नेते द काश्मीर फाईल्स चित्रपटासाठी मैदानात उतरले आहेत.
Published on

मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा प्रमाणात गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान मोदींसह भाजप नेते या चित्रपटासाठी मैदानात उतरले आहेत. आता यात भाजपच्या सहकारी पक्षाने उडी घेतली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असून, हा देशविरोधी शक्तींचा कट आहे, असा बॉम्बच भाजपच्या सहकारी पक्षाने टाकला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीनतराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल अनेक गंभीर आरोप केले आहेत. हा चित्रपट दहशतवाद्यांचा कट असून, याच्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी मांझी यांनी केली आहे. काश्मिरी पंडितांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करून त्यांना काश्मीर खोऱ्यात परतण्यापासून रोखण्याचा हे षडयंत्र असू शकते, असा दावाही त्यांनी केला आहे.

The Kashmir Files
आधी कोल्हापूर उत्तरची रंगीत तालीम अन् नंतर करुणा विरुद्ध धनंजय मुंडे अशीच थेट लढत!

बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) हा पक्षही सहभागी आहे. आता त्यांनी भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या काश्मीर फाईल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे बिहार सरकारमधील बिघाडी समोर आली आहे. असे असतानाच काश्मीर फाईल्सबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासह सगळ्या युनिटचीच चौकशी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. यामुळे आगामी काळात काश्मीर फाईल्समुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

The Kashmir Files
'काश्मीर फाईल्स'नं मोडले सगळे विक्रम...चित्रपटाची कोटीच्या कोटी उड्डाणे!

मोदींकडून चित्रपट अन् दिग्दर्शकाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भाजपचे (BJP) नेते या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाचे आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे जाहीर कौतुक केले होते. काश्मीर पंडितांवरील अत्याचार दाखवणारा हा चित्रपट पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात, असे मोदी म्हणाले होते. याचबरोबर मोदींनी अग्निहोत्री हे निडर असल्याची प्रशंसाही केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com