Raghav Chadha Twitter Bio : राज्यसभेतून निलंबित झाल्यानंतर चढ्ढा यांनी ट्विटरचा बायो बदलला; सोशल मीडियात एकच चर्चा

Monsoon Session News : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांना शुक्रवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले.
Raghav Chadha News
Raghav Chadha NewsSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांना शुक्रवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. 'नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी राज्यसभेतून चढ्ढा यांना निलंबित करण्यात आले. निलंबित केल्यानंतर त्यांनी ट्विटर बायोमध्ये बदल केला. त्यांनी केलेला बदल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी ट्वीटच्या बायोमध्ये बदल केला आहे. आधी त्यांच्या बायोमध्ये खासदार असे लिहिलेले होते. त्यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांनी निलंबिंत खासदार असे लिहिले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी प्रस्ताव मांडल्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी चढ्ढा यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. विशेषाधिकार समितीचा निर्णय येईपर्यंत चढ्ढा यांचे निलंबित करण्यात आले आहे.

Raghav Chadha News
Data Protection Bill : डिजिटल डेटा संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; नेमके काय बदल होणार ?

दिल्ली सेवा विधेयक (७ ऑगस्ट) रोजी राज्यसभेत मंजूर झाले. सभागृहाच्या कामकाजादरम्यान चढ्ढा यांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. या समितीसाठी त्यांनी काही खासदारांची नावे सुचवली होती. मात्र ५ खासदारांनी चढ्ढा यांनी त्यांच्या संमतीशिवाय त्यांची नावे घेतल्याचे सांगितले, जे योग्य नाही. यावर खासदारांनी आपल्या तक्रारीही मांडल्या.

Raghav Chadha News
Delhi Services Bill : केजरीवालांचे प्रयत्न फोल; अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि 'पोस्टिंग'वरील नियंत्रण गेलेच

यामध्ये तीन भाजपचे (BJP) खासदार होते. एक बीजेडीचे आणि एक खासदार अण्णाद्रुमूक पक्षाचे होते. या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत चौकशीची मागणी केली होती. सभागृहाच्या विशेषाधिकार समितीने चढ्ढा यांना नोटीस पाठवली आहे. दुसरीकडे चढ्ढा यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ज्या कागदावर त्यांनी बनावट स्वाक्षरी केली आहे, तो कागद घेऊन या, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com