Data Protection Bill : डिजिटल डेटा संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; नेमके काय बदल होणार ?

Data Protection Bill : ग्राहकांची वैयक्तिक माहिती मिळवण्यावर कंपन्यांवर येणार चाप..
Data Protection Bill :
Data Protection Bill : Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : डिजिटल डेटा संरक्षण या विधेयकाला आज देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी मंजुरी दिली. यामुळे या विधेयकाचे आता कायद्यामध्ये रूपांतर झाले आहे. लोकसभा आणि राज्यसभा सभागृहात हे विधेयक बहुमताने पारित केल्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्याकडे पाठवण्यात आले होते. राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी करताच या विधेयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. (Latest Marathi News)

या विधेयकामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळवणाऱ्या संस्थांना चाप बसणार आहे. सोबतच यापुढे ग्राहकांकडून माहिती गोळा करताना कायद्याचं कंपन्यांवर अनेक बंधने व माहिती जमा करताना संबंधित ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या कायद्याचा भंग कऱणाऱ्या कंपन्यांवर २५० कोटी रूपये दंड करण्यात येणार आहे.

Data Protection Bill :
Delhi Service Bill| ब्रेकींग : दिल्ली सेवा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी!

या कायद्यामुळे केंद्र सरकारला एक डेटा प्रोटेक्शन बोर्ड तयार करण्याचा अधिकार मिळाला असून या बोर्डाला सोशल मीडियावरील मजकूरा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. एक प्रकारे सोशल मीडियावर अंकुश मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप देखील सरकारवर या कायद्याच्या निमित्ताने करण्यात आला आहे.

Data Protection Bill :
NCP Split : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अन् वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र येणार..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com