Karnataka Elections 2023: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार: गुजरातनंतर आता कर्नाटकात दाखल होणार मानहानीचा खटला...

Rahul Gandhi News| राहुल गांधींनी कर्नाटकात भ्रष्टाचाराचे रेटकार्ड जारी केले आहे. यामुळे ते अडचणीत आले आहेत.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Elections 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. सुरतनंतर आता कर्नाटकातही त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी सुरू आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) कर्नाटकात भ्रष्टाचाराचे रेटकार्ड जारी केले आहे. त्यांनी आमचे दर सांगावेत, असे आव्हान भाजप खासदार लहारसिंग सरोया यांनी केले आहे. (After Gujarat, now in Karnataka too Rahul Gandhi will be filed for defamation)

मी आयुष्यात कधीही बेईमानीचा एक चहाही प्यायला नाही. त्यामुळे आता मी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. आपण आपल्या वकिलांच्या संपर्कात असून त्यासाठी तयारी करत असल्याचा दावाही त्यांनी सांगितले. राहुलच्या या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आपण दु:खी असल्याचही त्यांनी म्हटलं आहे. पण राहुल गांधींनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, त्यामुळे आपण खूप दुखावले गेल्याचही त्यांनी म्हटलं आहे. ही फक्त माझीच नव्हे तर संपुर्ण सरकारची बदनामी असल्याचा दावीह सरोया यांनी केला आहे. (Rahul Gandhi Defamation )

Rahul Gandhi
Jayant Patil : शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला; आता त्यांची नजर इतर पक्षांवर : पण, राष्ट्रवादी...जयंत पाटील थेटच बोलले

दरम्यान, 'मोदी' आडनावावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींवर खटला दाखल होता. सुरत जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना एका फौजदारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. यानंतर त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्यासाठी ३० दिवसांची मुदत देत जामीन मंजूर केला. निकालाच्या वेळी खुद्द राहुल गांधीही कोर्टात हजर होते. यानंतर २४ मार्चला त्यांची संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं.

आता राहुल गांधींनी कर्नाटकच्या निवडणुकांसाठी दंड थोपटले असताना इथेही भाजपने त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याची तयारी केली आहे. आता राहुल गांधी भाजपच्या या आव्हानाला कसे उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com