Ayodhya Rape Case : बलात्कार पीडितेला रुग्णालयात धमकावले; मुख्यमंत्री योगींची सपा नेत्याविरोधात बुलडोझर कारवाई सुरू

Ayodhya rape case victim family met Yogi Adityanath : अयोध्यात अल्पवयीन मुलीवर सामूहीक अत्याचारप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यानंतर सपा नेत्यावर बुलडोझर कारवाईची तयारी करण्यात आली आहे. सपा नेत्याच्या संपत्तीची माहिती महसूल विभागाने गोळा केली आहे.
Yogi Adityanath
Yogi Adityanath Sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Rape Case : अयोध्येतील अल्पवयीन मुलीवरील सामूहीक बलात्कार प्रकरणामुळे हादरलं आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यानंतर मुख्य आरोपी समाजवादी पक्षाचा नेता मोईद खान याच्याविरुद्ध मुख्यमंत्री योगी यांनी बुलडोझर कारवाईची तयारी सुरू केली. मोईद खान याच्या बेकरीसह अनेक मालमत्तेची शुक्रवारी महसूल विभागाने मोजमाप केली. यात मोईद खान याने अनेक भागात सरकारी जमिनींवर बेकायदा कब्जा केल्याचे समोर आलं आहे.

मोईद खान याची बेकरी आहे. तिथे बनवल्या जाणाऱ्या मालाचे देखील नमुने प्रशासनाने घेतले असून, बेकरी सील करण्यात आली आहे. बेकरीचा परवाना देखील रद्द होऊ शकतो, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) माणिकचंद सिंह यांनी सांगितले.

पीडितेला अत्याचारानंतर याची वाच्यता न करण्यासाठी धमकी देण्यात आली होती. पीडिता रुग्णालयात उपचार सुरू असताना तिला तिथे येऊन आरोपींनी धमकी दिली. समाजवादी पक्षाचा नेता तथा भादरस नगर पंचायतीचा अध्यक्ष मोहम्मद रशिद, जयसिंग राणा आणि आणखी एका जणावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Yogi Adityanath
Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, राहुल गांधी यांच्यावर परदेशातून हल्ला...

कलंदर पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत ही बलात्काराची घटना घडली. मुलीवर अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवण्यात आला. यानंतर तिच्यावर वेळोवेळी सामूहीक बलात्कार करण्यात आला. दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यावर बलात्काराची घटना समोर आली. पीडितेच्या वडिलांचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. आई आणि तिच्यासह चौघी बहिणी मोलमजुरी करून राहतात. पीडिता ही 12 वर्षाची असून, ती बहिणींमध्ये सर्वात लहान आहे.

Yogi Adityanath
Rahul Gandhi : राहुल गांधी 'चक्रव्यूहा'त? मध्यरात्री 1 वाजून 52 मिनिटांनी 'ईडी'बाबत खळबळजनक दावा

घटना अशी आली उघडकीस

मोईद खान याने पीडितेला बेकरीत बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तिथे राजू नावाच्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला. यानंतर राजूने देखील तिच्यावर अत्याचार केला. पीडिता दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. पीडिता आणि तिचे कुटुंब पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. परंतु त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. मोईन खान आणि राजू या दोघांना पोलिसांनी अटक केली. स्थानिक पोलिसांनी सुरवातीला मोईन खान याचे नाव तक्रारीत घेण्यास नकार दिला होता. परंतु पोलिस अधीक्षकांनी या प्रकाराची दखल घेतल्यानंतर मोईन खान याच्यावर कारवाई झाली.

यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Adityanath Yogi) यांची भेट घेतली. मोईन खानसह इतर आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री योगी यांनी पीडितेच्या कुटुंबियांना दिले. यानंतर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच मोईन खानच्या संपत्तीची महिती घेत त्यावर कारवाई निश्चित केली जाण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com