Sanjay Raut : संजय राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, राहुल गांधी यांच्यावर परदेशातून हल्ला...

Sanjay Raut Rahul Gandhi BJP : राहुल गांधी यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहेत. विदेशी भूमीवर षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut Rahul Gandhi
Sanjay Raut Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत सरकारवर टीका करत आहेत. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत त्यांच्या भाषणामुळे अस्वस्थ झालेले दोन मोठे नेते त्यांच्यावर ईडीचा छापा टाकण्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या या आरोपानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उठवला आहे. त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. विदेशी भूमीवर षडयंत्र रचले जात आहे. काहीही होऊ शकते. आमच्यावर, राहुल गांधीवर हल्ला होऊ शकतो, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी, विरोधकांनी सरकारचा धुव्वा उडावला आहे. सरकारची झोप उडाली आहे. केंद्रीय यंत्रणांद्वारे तसेच गुड्यांच्या मदतीने आमच्यावर हल्ला होऊ शकतो. लोकतंत्र वाचवण्यासाठी जे भूमिका घेत आहेत. त्यांच्यावर देखील हल्ला देखील होऊ शकतो. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होऊ शकतो, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut Rahul Gandhi
Assembly Election 2024 : विधानसभेलाही भाजपला धक्का बसणार? अंतर्गत सर्व्हेनं वाढवलं 'टेन्शन'

राज्य सरकारवर टीका

महायुती सरकाला जो लाडक्या बहिणीचा उमाळा आला आहे तो फक्त दोन महिन्यांसाठी आहे. दोन महिन्यांत राज्यावर कर्ज करून ते पळून जाणार आहेत. लाडक्या बहि‍णींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे, असे राऊत म्हणाले.

'तो' राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा

वेशांतर करून घेल्याचे उपमुख्यमंत्री सांगतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे वेशांतर करून गेल्याचे सांगतात. संवेदनशील विमानतळावरून वेशांतर करून जाणे म्हणजे हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. हा मुद्दा आम्ही संसदेत उचलून धरणार आहोत. औपचारिक गप्पांमध्ये ते बोलले याचा अर्थ ते खरे बोलले, असे देखील राऊत म्हणाले.

Sanjay Raut Rahul Gandhi
Electoral Bond : निवडणूक रोख्यांच्या SIT चौकशीवर ‘सुप्रीम’ निकाल; सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com