पंजाब फत्ते केल्यानंतर केजरीवाल गुजरात-हिमाचलच्या मोहिमेवर

Panjab| Arvind Kejariwal| Bhagwant Mann पंजाबमध्ये विक्रमी विजयानंतर आपने आता हिमाचलमध्येही आपला विजयी झेंडा फडकावण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
Gujarat Assembly Election 2022| AAP
Gujarat Assembly Election 2022| AAPSarkarnama Bureau
Published on
Updated on

नवी दिल्ली : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या (Aam Adami Party) दणदणीत विजयानंतर पक्षाने गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दोन्ही राज्यांतील निवडणुका या वर्षी नोव्हेंबरमध्ये (Gujarat Assembly Election 2022) होण्याची शक्यता आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर दिल्लीचे (Delhi) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री पदी नियुक्त केलेले भगवंत मान (Bhagwant Mann) हे दोघेही गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या मैदानात आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Gujarat Assembly Election 2022| AAP
भाजपच्या विजयानं विरोधक हादरले; अखिलेश यांच्या मित्रपक्षाकडून सर्व समित्या बरखास्त

दरम्यान, सुरत महापालिका निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने 27 जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने 6 महापालिकांच्या निवडणुका जिंकल्या असल्या, तरी त्यानंतरही गुजरातमध्ये 'आप'च्या अशा शानदार एन्ट्रीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. शहरी संस्थांच्या निवडणुकीत 'आप'ने ज्या प्रकारे कामगिरी केली, तशीच कामगिरी गुजरात विधानसभा निवडणुकीतही अपेक्षित आहे.

पंजाबमध्ये विक्रमी विजयानंतर आपने आता हिमाचलमध्येही आपला विजयी झेंडा फडकावण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी अरविंद केजरीवाल लवकरच हिमाचल प्रदेशचा दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणार आहेत. आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अनूप केसरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. पंजाबमधील जनतेने 'आप'च्या धोरणांवर विश्वास व्यक्त करत एकतर्फी जनादेश दिला असून, त्यामुळेच पंजाबमध्ये 'आप'चे सरकार स्थापन झाले. राजकीय पक्षांचे बडे नेते आपल्या संपर्कात असून आप पक्षात सदस्यत्व मिळवण्याबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून येत आहे. 'आप' पक्ष प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनाच पक्षात घेणार आहे.

हिमाचल प्रदेशातील सर्व 68 विधानसभा जागा लढवण्याव्यतिरिक्त, आम आदमी पक्षाने शनिवारी पुढील महिन्यात शिमला येथे होणाऱ्या नागरी निवडणुकीतही आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ''उत्तर प्रदेशमध्ये 'आप'ला एकही जागा मिळाली नाही. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवली पण त्यांचा जामीन रद्द झाला. ते फक्त मोठ्या गोष्टी बोलतात. हिमाचलमध्ये त्यांच्यासाठी काहीच नाही. हिमाचल प्रदेशात फक्त भाजपच सत्तेवर येणार," असा विश्वास अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

आतापर्यंत हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत होती. पण आता सुरत नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाने उत्साही आपला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मैदानात संधीची दिसत आहे. पंजाबच्या सीमेला लागूनच हिमाचल प्रदेश असल्याने,पंजाबच्या निवडणूकांतील विजयाची लाट हिमाचल प्रदेशातही पोहचेल असा विश्वास आप ने व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com