ED Chargesheet News : ‘ईडी’ पहिल्यांदाच राजकीय पक्षाला करणार आरोपी; कोर्टातच दिली माहिती...

Delhi Liquor Scam Case : मद्य धोरण घोटाळ्यामध्ये ईडीकडून मोठे पाऊल उचलले जाणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ईडीने मुख्यमंत्री केजरीवालांना यापुर्वीच अटक केली होती.
ED AAP
ED AAPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी पुढील काळात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे संकेत ईडीने मंगळवारी दिले. या घोटाळ्यात आम आदमी पक्षालाही आरोपी करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत ईडीनेच दिल्ली हायकोर्टात ही माहिती देत आपचे टेन्शन वाढवले आहेत. ईडीने (ED Chargesheet) आधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती.

ईडीने मंगळवारी दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) आपलाही घोटाळ्यात आरोपी करणार असल्याची माहिती दिली. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ‘आप’चा (AAP) आरोपी म्हणून समावेश केला जाणार आहे. असे झाल्यास एखाद्या घोटाळ्यात राष्ट्रीय पक्षाला (Political Party) आरोपी करण्याची ही पहिलीच घटना असेल. (Latest Marathi News)

ED AAP
Swati Maliwal News : अखेर ‘आप’ची कबुली; स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या PA वर होणार कारवाई  

दिल्ली हायकोर्टात ईडीच्या वतीने झोहेब हुसेन यांनी माहिती दिली. पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार असून आपचा आरोपी म्हणून समावेश केला जाईल, असे हुसेन यांनी कोर्टाला सांगितले आहे. दिल्ली हायकोर्टाने काही दिवसांपुर्वीच केजरीवालांच्या (Arvind Kejriwal) अटकेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. ही अटक योग्यच असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. (High Court News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, ईडीने केजरीवालांना 21 मार्चला अटक केली होती. दिल्ली हायकोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केजरीवालांकडून लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) प्रचारासाठी अंतरिम जामीनाची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत कोर्टाने शुक्रवारी केजरीवालांना दोन जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर लगेचच केजरीवालांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे.

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) केजरीवालांसह आपचे खासदार संजय सिंहही तुरुंगात होते. तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अजूनही तुरुंगातच आहे. ईडीने आपच्या या तीन बड्या नेत्यांसह तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता यांनाही अटक केली आहे. आता आम आदमी पक्षालाच आरोपी केले जाणार असल्याने पक्षातील नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आरोपी करण्याची ही पहिली घटना असणार आहे. त्यामुळे कोर्टाकडून याबाबत काय निर्देश दिले जाणार, ईडीकडून पक्षावर कोणते आरोप लावले जाणार, कोर्टाकडून पक्षावर आरोप निश्चित केले जाणार का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

ED AAP
PM Narendra Modi : गंगा किनारी आरती, भैरव दर्शन अन् शक्तीप्रदर्शन..! पंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com