एका शीख मुलीमुळं मुस्लिम मुलींना मिळाली महाविद्यालयात हिजाबची परवानगी!

हिजाबचा वाद आता उच्च न्यायालयात गेला असला तरी त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत.
Hijab
HijabSakarnama

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) आता हिजाबवरून (Hijab) वाद पेटला आहे. हा वाद आता उच्च न्यायालयात गेला असला तरी त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. या वादात आता बंगळूरमधील महाविद्यालयातील एक अनोखं उदाहरण समोर आलं आहे. या महाविद्यालयातील शीख मुलीला तिची पगडी काढण्यास सांगण्यात आलं होतं. तिने याला नकार दिला होता. यामुळे अखेर पगडी घालणाऱ्या या मुलीला आणि हिजाब घालणाऱ्या मुलींना महाविद्यालयात परवानगी देण्यात आली आहे.

माऊंट कारमेल पीयू कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. हिजाब वादानंतर कॉलेज 16 फेबुवारीला पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशाची माहिती देण्यात आली होती. मात्र, एक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने या कॉलेजला या आठवड्यात भेट दिली. त्यावेळी काही विद्यार्थिनी हिजाब घातलेल्या आढळून आल्या. याबाबत कॉलेजनं म्हटलं आहे की, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाच्या आदेशाची कल्पना दिली होती. त्यावेळी हिजाब घालणाऱ्या मुलींनी पगडी घालणाऱ्या एका शीख मुलीचा मुद्दा उपस्थित केला. त्या मुलीला याबद्दल सूचना करण्यात आली होती. मात्र, तिच्या पालकांनी यास नकार दिला. त्यामुळे आम्ही हिजाब घालण्यापासून विद्यार्थिनींना रोखले नाही. त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

Hijab
'एपीआय'सह 'पीएसआय'ला खंडणी प्रकरणात अटक होताच 'आयपीएस'ची उचलबांगडी

राज्यातील हिजाब वादावर उच्च न्यायालयाने अंतरीम आदेश दिला आहे. यात हिजाब आणि भगवे उपरणे हे दोन्ही घालून शाळा व महाविद्यालयांमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, नुकताच इंडी येथील एका महाविद्यालयात एक विद्यार्थी लाल टिळा लावून आला होता. त्याला प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं होतं. शिक्षकांनी या विद्यार्थ्याला कपाळावरील टिळा पुसून टाकण्यास सांगितलं होतं. त्यानंतर त्याला महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे सांगण्यात आलं होतं. त्याने असा टिळा लावल्यास हिजाब आणि भगव्या उपरण्याचा वाद पुन्हा सुरू होईल, असेही शिक्षकांनी नमूद केलं होतं. यावरून विद्यार्थी आणि शिक्षकांच्यात शाब्दिक वाद झाला होता.

Hijab
ईडीच्या कारवाईची मलिकांना आधीच होती माहिती! मुलीनंच केला गौप्यस्फोट

अनेक महाविद्यालयांमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेले विद्यार्थी समोरासमोर येऊन वाद होत होते. अनेक महाविद्यालयांमध्ये घोषणाबाजी आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com