Wrestlers Protest Against Brij Bhushan Singh: उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटने एक कविता शेअर केली आहे. विनेश फोगटने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर कवी पुष्यमित्र उपाध्याय यांच्या कवितेचा फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये 'वुई वॉन्ट जस्टिस' अशी मागणी केली आहे.
'वुई वॉन्ट जस्टिस' असे कॅप्शन देत उत्तर प्रदेशातील एटा येथे राहणारे कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची 'सुनो द्रौपदी शास्त्र उठा लो' ही प्रसिद्ध कविता ट्विट केली आहे. शेअर केलेल्या कवितेच्या काही ओळी 'सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे, छोड़ो मेहंदी खड़ग संभालो, खुद ही अपना चीर बचालो...' (Wrestlers Protest News)
गेल्या सहा महिन्यांपासून ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक, ऑलिम्पियन विनेश फोगट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने आंदोलक कुस्तीपटूंना दिले होते. शासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर पैलवानांनी आंदोलन स्थगित केले. (Vinesh Phogat)
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (15 जून) ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावरील POCSO अंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफारस केली आणि लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याच्या आरोपांप्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात रद्द अहवाल दाखल केला आहे. 4 जुलै रोजी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्याचवेळी, सिंग यांच्यावर सहा कुस्तीपटूंच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यासाठ न्यायालयाने 22 जूनला सुनावणी होणार आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.