BJP News; भाजपच्या खासदारांनी `या`साठी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर!

केंद्र व राज्य सरकारच्या योजना अमंलबजावणीच्या अभावामुळे जनतेत खदखद असल्याचा साक्षात्कार
Unmesh Patil
Unmesh Patil Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : (Jalgaon) केंद्र (centre) व राज्य (Maharashtra) शासनाच्या विविध योजनांचा निधी महापालिकेकडे उपलब्ध आहे. मात्र, त्याची अमलंबजावणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जनतेत विकासकामांबाबत खदखद आहे. आम्ही आता दर आठवड्याला विकासकामांचा आढावा घेऊन अंमलबजावणीला चालना देणार आहोत व जनतेच्या मनातील खदखद कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी सांगितले. (People unhappy with government devolopment schemes)

Unmesh Patil
Dhule News; शेतकऱ्यांनी केली खासदार डॉ. सुभाष भामरेंची कोंडी?

महापालिकेl झालेल्या आढावा बैठकीत भाजपचे खासदार उन्मेष पाटील, भाजपचे (BJP) आमदार भोळे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विकासाच्या योजनांबाबत आढावा घेतला. जनतेला याबाबत माहिती मिळत नाही, अशी तक्रार त्यांनी केली. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे, उपायुक्त अभिजित बाविस्कर, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे उपस्थित होते.

Unmesh Patil
Thackeray Vs Shinde : आयोगाच्या निर्णयाला आव्हान; पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणीची मागणी!

एप्रिलमध्ये ‘अमृत’चे लोकार्पण करा

शहरात अमृत-एक ही योजना अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता नागरिकांना तत्काळ नळकनेक्शनची जोडणी करून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात त्याचे लोकार्पण करा, असे आदेशही त्यांनी दिले. दुसऱ्या टप्प्यातील ‘डीपीआर’बाबतही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करू. जीवन प्राधिकरणाचे दर तीन टक्क्यांवरून कमी करता येतील काय, याबाबत चर्चा करून योजना मार्गी लावू. योजनेचे लोकार्पण होत नाही, तोपर्यंत मक्तेदारांची बिले काढू नयेत, असेही त्यांनी आदेश दिले.

जनतेच्या मनातील खदखद कमी करणार

खासदार उन्मेश पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की महापालिकेत केंद्र व राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात आला आहे. मात्र, त्याची व्यवस्थित अमलंबजावणी होत नाही. रस्ते तसेच इतर कामांबाबत नागरिकांमध्ये खदखद आहे. वास्तविक सर्व योजनांसाठी शासनाचा पैसा उपलब्ध आहे. मात्र, अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. महापौर व उपमहापौरांची मुदत आता संपत आहे. यापुढे दर आठवड्याला बैठक घेऊन आम्ही अधिकारी, नगरसेवकांशी संवाद साधून प्रत्येक कामाला चालना देऊन जनतेच्या मनातील खदखद कमी करणार आहोत.

आमदार भोळेंकडून अधिकारी फैलावर

आमदार सुरेश भोळे यांनी निधी असूनही शहरात योजना राबविण्यात येत नसल्याबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ते म्हणाले, की आम्ही आमदार, खासदार निधी उपलब्ध करून देतो. मात्र, तुम्ही त्याची व्यवस्थित अमंलबजावणी करीत नाहीत. त्यामुळे जनतेच्या नाराजीचा आम्हाला सामना करावा लागतो. ‘वॉटरग्रेस’च्या कामाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, त्याबाबत कडक कारवाई केली जात नाही. अधिकाऱ्यांनी काही अडचणी असतील, तर आम्हाला सांगाव्यात. आम्ही त्या सोडवू, परंतु योजनांची अमंलबजावणी करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com