किव्ह : युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यामुळे रशियाची (Russia) जागतिक पातळीवर कोंडी केली जात आहे. यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादण्यात आले आहेत. आता या युद्धाचा परिणाम थेट भारतावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रशियाने पुकारलेले युद्ध भारतालाही महागात पडू शकण्याची चिन्हे आहेत. कारण अमेरिकेने (USA) भारतावर निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत
भारताने रशियाकडून एस-400 ट्रायम्फ ही मिसाईल संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. रशियाशी संरक्षण खरेदी व्यवहार केल्याने भारतावर निर्बंध घालण्याचा अमेरिकेचा विचार सुरू आहे. यातच आता रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारले असून, रशियाशी व्यवहार करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध घालत आहे. संयुक्त राष्ट्रांत रशियाच्या विरोधात ठराव मांडण्यात आल्यानंतर भारताने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळेही अमेरिकेने भारतावर निर्बंध घालण्याबाबत गंभीरपणे विचार सुरू केला आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया, उत्तर कोरिया आणि रशिया यांच्याशी व्यवहार करणाऱ्या देशांवर निर्बंध घालावेत, असा कायदा अमेरिकेत आहे. आता यातून भारताला मुभा द्यायची की निर्बंध घालायचे याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हेच घेऊ शकतात. रशियाने २०१४ मध्ये युक्रेनपासून क्रिमिया वेगळा केल्यानंतर आणि अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्यानंतर हे निर्बंध रशियावर घालण्यात आले आहेत. यामुळे रशियासोबत संरक्षण खरेदीसह मोठा आर्थिक व्यवहार करणाऱ्या देशांवर निर्बंध लादले जाऊ शकतात.
एसबीआयकडून रशियावर निर्बंध
भारताच्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही रशियाला (SBI) दणका दिला आहे. रशियातील कंपन्यांच्या व्यवहारांवर एसबीआयने निर्बंध घातले आहेत. एसबीआयने (SBI) रशियन कंपन्यांवर घातलेले आर्थिक निर्बंध हे आंतरराष्ट्रीय निर्बंधांचाच भाग आहेl. एसबीआयचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विस्तार आहे. यामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने घातलेल्या निर्बंधांचे एसबीआयला पालन करावे लागते. अमेरिका आणि युरोपियन युनियनने रशियावर निर्बंध घालताच त्याचे पालन एसबीआयने केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, एसबीआयची 31 ऑक्टोबर 2021 अखेर विदेशात 74 कार्यालये होती. यात वॉशिंग्टनमध्ये महत्वाचे कार्यालय असून, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, ब्रिटन आणि कॅनडा येथे एसबीआयच्या उपकंपन्या कार्यरत आहेत. एसबीआय आणि कॅनरा बँकेच्या संयुक्त मालकीच्या कमर्शियल इंडो बँक रशियात कार्यरत आहेत. या बँकेत एसबीआयचा हिस्सा 60 टक्के तर कॅनरा बँकेचा 40 टक्के हिस्सा आहे. (Russia-Ukraine War Updates)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.