भाजपचं पुढचं टार्गेट ठरलं; 'यूपी'त विजय मिळवून देणाऱ्या टीमवर दुसरी मोठी जबाबदारी

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) भाजपने जोरदार विजय मिळवला आहे.
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत (UP Election 2022) भाजपने जोरदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपने (BJP) इतर राज्यांवर लक्ष्य केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. याचवेळी उत्तर प्रदेशात भाजपला विजय मिळवून देणारी टीम आता केंद्रस्थानी आली आहे. या टीमला भाजपने पुढील टार्गेट ठरवून दिले आहे. ही 60 जणांची टीम आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी थेट सामना करणार आहे.

उत्तर प्रदेशनंतर भाजप नेतृत्वाचे लक्ष आता तेलगंणकडे (Telangana) वळाले आहे. राज्यातील पुढील विधानसभा निवडणूक पुढील वर्षी होत आहे. या निवडणुकीची जबाबदारी उत्तर प्रदेशातील 60 जणांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तेलंगणमधील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीचे काम राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर करीत आहेत. किशोर यांच्याशी भाजपच्या या 60 जणांच्या टीमचा सामना होणार आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच! नाना पटोलेंचं मोठं भाकीत

भाजपची टीम या महिन्याच्या अखेरीस तेलंगणमध्ये काम सुरू करणार आहे. पुढील काही दिवसांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे तेलंगणला भेट देणार आहेत. राज्यात जनगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाला हे दोघे हजेरी लावणार आहेत. तेलंगणमध्ये भाजपचा झेंडा रोवण्यासाठी पक्षाचे नेतृत्व उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालांची प्रतीक्षा करीत होते. आता भाजपने तेलंगणकडे लक्ष वळवल्याने सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती आणि मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
गोव्यात 'आसाम पॅटर्न' अन् भाजप नेतृत्वाकडून मुख्यमंत्री सावंतांना डच्चू?

उत्तर प्रदेशात भाजप व मित्रपक्षांनी मिळून 273 जागांवर विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीत एनडीएला 312 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत 39 जागा कमी मिळाल्या असल्या तरी योगींचा हा विजय ऐतिहासिक ठरला आहे. समाजवादी पक्षाला 125 जागा मिळाल्या असून मागील निवडणुकीच्या तुलनेत तीनपट वाढ झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस व बसपाची धूळधाण झाली आहे. बसपला केवळ एक आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनीही गोरखपूर शहर मतदारसंघातून भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांना 1 लाख 65 हजार 499 मतं मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com