पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच! नाना पटोलेंचं मोठं भाकीत

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी निराशानजक राहिली आहे.
Nana Patole
Nana Patole Sarkarnama

मुंबई : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची (Congress) कामगिरी निराशानजक राहिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वावर या निमित्ताने प्रश्न उपस्थित केले जात आहे. असे असताना आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठे भाकीत केले आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस जिंकेल आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असे पटोलेंनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला अपयश आले आहे. यावरून पक्षात मोठा गदारोळ सुरू आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक याबाबत आत्मपरीक्षण करण्यासाठी बोलावण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पक्षातील नेत्यांनी याला आक्षेप घेत गांधी कुटुंबानेच नेतृत्व करावे, अशी एकमुखी भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या कामगिरीवरून इतर लक्ष्य करीत आहेत. याचवेळी काँग्रेस नेते आक्रमक पवित्रा घेऊ लागले आहेत.

नाना पटोले यांनी आता पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असे भाकित केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवेल. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असे ट्विट पटोले यांनी केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत अनेकदा मंत्र्यांमधील मतभेद आणि नाराजी समोर आली आहे. अशातच नाना पटोले यांनी केलेले हे विधान पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला विषय ठरत आहे.

Nana Patole
गोव्यात 'आसाम पॅटर्न' अन् भाजप नेतृत्वाकडून मुख्यमंत्री सावंतांना डच्चू?

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सहभागी होण्यास तयार नव्हत्या, असाही गौप्यस्फोट नाना पटोलेंनी केला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होऊ नये, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. अनेक प्रयत्न केल्यानंतर त्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील होण्यास तयार झाल्या. पण केवळ भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आणि शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली.

Nana Patole
राजकारण तापलं; कोल्हापूर उत्तरची खरी लढत दोन पाटलांमध्येच रंगणार!

भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद नको; पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी अट सोनिया गांधींनी घातली होती. याशिवाय शेतकर्‍यांची कर्जमाफी हा विषय आमच्या दृष्टीने प्राधान्याचा होता, असेही पटोलेंनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com