Ahmedabad Air Plane Crash : चमत्कार, नशीबवान, देवाची कृपा की आणखी काही? कसा वाचला विमान अपघातातील एकमेव प्रवासी? सांगितला थरारक अनुभव

Ramesh Vishwakumar Air Plane Crash : रमेश हे ब्रिटीश नागरिक असून ते मागील 20 वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत आहेत. ते आपला भाऊ अजय कुमार यांच्यासह भारतामध्ये आपल्या परिवाराला भेटण्यासाठी आले होते.
Ramesh Vishwakumar narrates his heart-stopping escape from the plane crash that claimed hundreds of lives.
Ramesh Vishwakumar narrates his heart-stopping escape from the plane crash that claimed hundreds of lives.sarkarnama
Published on
Updated on

Ramesh Vishwakumar Experience : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानातून प्रवास करणाऱ्या 242 पैकी 241 जणांना मृत्यू झाला. या अपघातामधून अवघा एक प्रवासी रमेश विश्वकुमार वाचला. एवढ्या भीषण अपघातामधून रमेश वाचल्याने अनेकांना तो चमत्कार वाटतो आहे. पण या थरारत अपघातविषयी रमेश कुमार यानेच सांगितले.

रमेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला मोठी दुखापत झालेली नाही. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला माहीत नाही मी कसा वाचलो. पण देवाची मर्जी होती. मी उडीही मारली नाही. विमानातील 11A या सीट नंबरवर बसलो होतो. ही सीट एक्झिटच्या अगदी शेजारी होती. त्यामुळे अपघातवेळी एक्झिटमधून बाहेर फेकले गेलो असावा.

रमेश यांनी सांगितले की, विमानाच्या टेकऑफनंतर अवघ्या 30 सेकंदामध्ये मोठा धमाका झाला. विमानाला हवेत झटके बसले आणि जोरात जमीनीवर आदाळले. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा चारही बाजूंना धूर आणि मृतदेह होते. मी घाबरलो होतो पण कसातरी माझ्या सीटवरून उठून बाहेर आलो.

Ramesh Vishwakumar narrates his heart-stopping escape from the plane crash that claimed hundreds of lives.
Raj Thackeray On Plane Crash : अहमदाबादमधील विमान अपघातनंतर राज ठाकरेंनी 'ड्रीमलाईनर'ची कुंडलीच मांडली; पुरावे देत म्हणाले, 'अनेक तक्रारी...'

रमेश हे ब्रिटीश नागरिक असून ते मागील 20 वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत आहेत. ते आपला भाऊ अजय कुमार यांच्यासह भारतामध्ये आपल्या परिवाराला भेटण्यासाठी आले होते. आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्ब्येतीची विचारपूस केली.

265 जणांचा मृत्यू

विमान अपघातामध्ये 241 प्रवासी तसेच विमान ज्या रुग्णालयाच्या हाॅस्टेलवर पडले त्यातील शिकाऊ डाॅक्टर, विमानातील क्रूमेंबर अशा एकुण 265 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये 169 भारतीय प्रवासी, पोर्तुगालचे 7, ब्रिटीश नागरिक 53 , आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. दरम्यान, टाटा समुहाने अपघातामध्ये मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Ramesh Vishwakumar narrates his heart-stopping escape from the plane crash that claimed hundreds of lives.
Israel Attack Iran : मोठी बातमी! इस्त्राइलचा इराणवर हल्ला, आण्विक तळ केले टार्गेट; लष्कर प्रमुखाचा मृत्यू?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com