
Air india : अहमदाबाद विमान दुर्घटना ताजी असतानाच शुक्रवारी (13 जून) एअर इंडियाने 16 विमाने परत बोलवली आहेत किंवा वळवली आहेत. इराण - इस्रायल तणावामुळे हवाई हद्द बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आहे. यातील एअर इंडियाचे AIC129 हे मुंबईहून लंडनला जाणारे विमान तर टेकऑफनंतर तब्बल तीन तासांनी मुंबईत परतले.
दरम्यान, प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल एअर इंडिया प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून प्रवाशांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर उड्डाणे रद्द किंवा फेयर रीशेड्यूलवरील रिफंडही प्रवाशांना देण्यात येणार आहे. विमाने वळविण्यात आलेल्या ठिकाणांवरून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
AI130 – लंडन हीथ्रो → मुंबई → विएन्ना येथे वळवले
AI102 – न्यूयॉर्क → दिल्ली → शारजाह येथे वळवले
AI116 – न्यूयॉर्क → मुंबई → जेद्दा येथे वळवले
AI2018 – लंडन हीथ्रो → दिल्ली → मुंबई येथे वळवले
AI132 – लंडन हीथ्रो → बेंगळुरू → शारजाह येथे वळवले
AI2016 – लंडन हीथ्रो → दिल्ली → विएन्ना येथे वळवले
AI104 – वॉशिंग्टन → दिल्ली → विएन्ना येथे वळवले
AI190 – टोरांटो → दिल्ली → फ्रँकफुर्ट येथे वळवले
AI126 – शिकागो → दिल्ली → जेद्दा येथे वळवले
AI129 – मुंबई → लंडन हीथ्रो → मुंबईकडे परत
AI119 – मुंबई → न्यूयॉर्क → मुंबईकडे परत
AI103 – दिल्ली → वॉशिंग्टन → दिल्लीकडे परत
AI106 – न्युवर्क → दिल्ली → दिल्लीकडे परत
AI189 – दिल्ली → टोरांटो → दिल्लीकडे परत
AI188 – व्हँकुव्हर → दिल्ली → जेद्दा येथे वळवले जात आहे
AI101 – दिल्ली → न्यूयॉर्क → फ्रँकफुर्ट/मिलान येथे वळवले जात आहे
सध्या सर्व प्रवाशांना airindia.com वर त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.