
Air India flight crashed : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळून मोठा अपघात घडला आहे. या विमानातून 230 प्रवासी आणि 12 क्रु मेंबर प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचा ताबा सुटला आणि अहमदाबादजवळील मेघानीनगर येथील हॉर्स कँम्प परिसरात कोसळले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विमानाने अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 1 वाजून 31 मिनिटांनी उड्डाण केले. पुढच्या 5 मिनिटांतच विमानातून अखेरचा सिग्नल मिळाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात हे विमान 700 फुटांवरून हॉर्स कॅम्प परिसरात कोसळले.
विमान कोसळतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात विमान कोसळल्यानंतर एक मोठा स्फोट झाल्याचे दिसून येतो. अहमदाबादवरून लंडनला जाणारे हे नॉन स्टॉप विमान होते. त्यामुळे विमानाचा फ्युअल टँक पूर्ण भरला होता. काही व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट आणि विमानाचे छिन्नविछिन्न अवषेश दिसत आहेत. या अपघातात मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अहमदाबादचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस, अग्निशामक दल, सीआयएसएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. याशिवाय केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही अपघात स्थळी पोहोचले असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.