Ajit Doval : अजित डोवाल यांची पंतप्रधान मोदींकडून NSA पदावर पुनर्नियुक्ती

Ajit Doval National Security Advisor of India : भारताचे अरब देशांसोबत चांगले संबंधांसाठी अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताने पाकिस्तानविरोधात नेहमीच आक्रमक आणि कडक धोरण अवलंबले आहे.
Ajit Doval
Ajit Dovalsarkarnama
Published on
Updated on

Ajit Doval News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांना पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुनर्नियुक्ती केली. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सेवा विस्तारास मान्यता दिली. प्रधान सचिव पीके मिश्रा यांचा देखील सेवा विस्ताराचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

केंद्रीय मंत्रिमंडाळ समितीच्या निर्णयानुसार अजित डोवाल पुढील पाच वर्षे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत राहतील. त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जाचा अधिकार असून, तो पूर्वी सारखाच असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा सत्तास्थापनेनंतर पहिला इटली दौरा आहे. या दौऱ्यात अजित डोवाल (Ajit Doval) सहभागी असणार आहेत. इटलीत जी-7 शिखर परिषद होत आहे. या परिषदेत अजित डोवाल सहभागी होतील.

अजित डोवाल आयपीएस अधिकारी आहेत. गुप्तचर अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कामाची केंद्र सरकारने नेहमीच दखल घेतली आहे. भारताचे प्रतिस्पर्धी देशांचे देखील अजित डोवाल यांच्या रणनीतीवर लक्ष असते. देशविघातक कृती करणारे दहशतवादी देखी अजित डोवाल यांचा धसका घेतात.

अजित डोवाल यांच्या कारवाया प्रतिस्पर्धी देशांना 'नामोहरण' करतात. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांची पुन्हा नियुक्ती करून देशविघातक कृतींची गय होणार नाही, असाच संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात 2014 मध्ये सत्तेत आले. अजित डोवाल हे तेंव्हापासून पंतप्रधान मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून जोडले गेले आहेत.

Ajit Doval
BS Yediyurappa : भाजपला मोठा धक्का, येडियुरप्पांना अटक होणार; गृहमंत्र्यांनीच दिले संकेत...

भारताचे अरब देशांसोबत चांगले संबंधांसाठी अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारताने पाकिस्तानविरोधात नेहमीच आक्रमक आणि कडक धोरण अवलंबले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात अजित डोवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आता कुवेत येथे मोठी दुर्घटना झाली. अग्नितांडवात 42 भारतीयांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदी यांनी या घटनेची दखल घेतली. यावेळी अजित डोवाल उपस्थित होते.

Ajit Doval
Red Fort Terrorist Attack : पाकिस्तानी दहशतवाद्याच्या फाशीच्या शिक्षेवर राष्ट्रपतींनी दिला 'हा' निर्णय!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com