Red Fort terror attack convict sentenced to death : राष्ट्रपती द्रौपीद मुर्मू यांनी लाल किल्ल्यावर जवळपास 24 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील दोषी पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अश्फाक याची फाशीची शिक्षा कायम ठेवली असून, त्याची दया याचिका फेटाळली आहे. 25 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती झाल्यापासून मुर्मू यांच्यावतीने फेटाळली गेलेली ही दुसरी दया याचिका आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 3 नोव्हेंबर 2022 रोजी आरिफची समीक्षा याचिका फेटाळली होती. ज्यामध्ये याप्रकरणात त्याला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली होती.
तज्ज्ञांचे मत आहे की, फाशीची शिक्षा झालेला दोषी आताही संविधानच्या कलम 32 अंतर्गत प्रदीर्घ विलंबाच्या आधारावर आपली शिक्षा कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतो.
अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती सचिवालयाच्या 29 मे च्या आदेशाचा हवाला देत म्हटले की, 15 मे रोजी प्राप्त झालेली आरिफची दया याचिका 27 मे रोजी फेटाळली गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम राखत म्हटले होते की, आरिफच्या बाजूने कोणतीही दिलासा देणारी बाब नव्हती आणि यावर जोर दिला की लाला किल्ल्यावर हल्ला देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका आहे.
22 डिसेंबर 2000 रोजी लष्कर ए तोयबाचे चार दहशतवादी लाल किल्ला परिसरात घुसले होते आणि 7 राजपूताना रायफल्सच्या तुकडीवर गोळीबार सुरू केला होता. या हल्ल्यात तीन सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. तर या प्रकरणातील एका दहशतवाद्याला हल्ल्याच्या चार दिवसानंतर दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. तर उर्वरीत अबु शाद, अबु बिलाल आणि अबु हैदर हे तीन विविध चकमकीत मारले गेले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.