Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांआधीच अजित पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव; हे आहे कारण...

Supreme Court : निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा शरद पवार गटाकडून देण्यात आला आहे. त्याआधीच खबरदारी म्हणून अजित पवार गट कोर्टात...
Published on

New Delhi : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले. त्यानंतर शरद पवार गटाने या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कुणाची? सुप्रीम कोर्टात सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Sharad Pawar Vs Ajit Pawar)

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने आज सकाळी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. गटाकडून कोर्टात (Supreme Court) कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकालाविरोधात शरद पवार गटाकडून कोर्टात याचिका दाखल झाल्यास कोणताही आदेश देण्यापुर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका करत अजित पवार गटाकडून सावध पावले उचलण्यास सुरूवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, कोर्टात जाण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच स्पष्ट केले आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य आणि संस्थापक नेते हे केवळ शरद पवार आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालामागे अदृश्य शक्ती असल्याचे सांगत त्यांनी कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनातील वादाबाबत सुप्रीम कोर्टाने नोंदविलेल्या निरीक्षकांचा हवाला दिला आहे. विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष होत नाही, याच मार्गाने शरद पवार गटही सुप्रीम कोर्टात आपली बाजू मांडणार हे स्पष्ट आहे.

पक्षाचे नाव व चिन्ह कोणते?

निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तातडीने पक्षाचे नाव व चिन्हाचे पर्याय देण्यास सांगितले आहे. राज्यसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने हे पर्याय तात्पुरते असतील, असे दिसते. त्यानुसार शरद पवार गटाने आज दुपारी चार वाजेपर्यंत हे पर्याय दिले जाणार आहे. पक्षाच्या नावामध्ये ‘राष्ट्रवादी’ हा शब्द असेल, असे समजते.

Ajit Pawar, Sharad Pawar
MLA Rohit Pawar : महाभारतातील 'तो' प्रसंग सांगत रोहित पवारांनी विरोधकांना डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com