Mayawati News : मायावतींनी भाच्याला आणलं वठणीवर; गयावया करत म्हणतोय, सासरवाडीची अडचण...

Akash Anand Seeks Re-entry into Bahujan Samaj Party (BSP) : आकाश आनंद यांनी रविवारी ट्विटरवरून आपल्याला पुन्हा पक्षात घेण्याची विनंती मायावतींना केली आहे.
Akash Anand, Mayawati
Akash Anand, MayawatiSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics : बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांनी आपला भाचा आकाश आनंद यांना चांगलेच वठणीवर आणल्याचे दिसते. वादग्रस्त विधाने आणि वागणुकीमुळे काही दिवसांपूर्वी मायावतींनी त्यांची सर्व पदांवरून हटवत पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता आकाश आनंद यांना चांगलाच पश्चाताप झालेला दिसतोय.

आकाश आनंद यांनी रविवारी ट्विटरवरून आपल्याला पुन्हा पक्षात घेण्याची विनंती मायावतींना केली आहे. यापुढे सासरवाडीकडील लोक पक्षहिताच्या आड येणार नाही, त्यांचा सल्ला ऐकणार नाही, अशी गयावयाही त्यांनी केली आहे. त्यांनी मायावतींनी माफी मागत पक्षासाठी काम करण्याची संधी देण्याचे आवाहन केले आहे.

Akash Anand, Mayawati
Chief Justice : महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, कुटुंबाला राजकीय वारसा

आकाश आनंद काय म्हणाले?

बीएसपीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, यूपीच्या चारवेळच्या मुख्यमंत्री आणि लोकसभा व राज्यसभेच्या खासदार राहिलेल्या मायावतींनी मी माझ्या एकमेव राजकीय गुरू आणि आदर्श मानतो. आज मी ही प्रतिज्ञा करतो की, बहुजन समाज पक्षाच्या हिताआड माझी नाती, विशेष करून माझ्या सासरवाडीवाल्यांची अडचण होऊ देणार नाही, असे आकाश आनंद यांनी म्हटले आहे.

केवळ हेच नाही तर काही दिवसांपूर्वी मी केलेल्या ट्विटबाबतही माफी मागतो. त्याच ट्विटमुळे मायावतीजींनी मला पक्षातून काढून टाकले होते. यापुढे मी कोणत्याही राजकीय निर्णयासाठी कोणत्याही नातेवाईकांचा किंवा सल्लागारांचा सल्ला घेणार नाही. मायावतींनी दाखवलेली दिशा आणि सूचनांचे पालन करेन, असे आकाश आनंद यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Akash Anand, Mayawati
Amit Shah News : अण्णामलाईंना आधी गप्प केलं, नंतर कौतुक करावं लागलं; शहांची चाणक्यनीती फसली...

पक्षातील ज्येष्ठ आणि जुन्या लोकांचा सन्मान करून त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकेन, असे म्हणत आकाश आनंद यांनी आपल्याला चूक कळल्याचे संकेत दिले आहेत. माझ्या सर्व चुका माफ करून पुन्हा पक्षात घ्यावे आणि पक्षात काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यापुढे पक्ष आणि मायावतीजींचा स्वाभिमान आणि आत्मसन्मान दुखावला जाईल, अशी कोणतीही चूक करणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com