Akhilesh Yadav Wealth : अखिलेश यादवांनी कन्नौज मतदारसंघातून उमेदवारी दाखल करत जाहीर केली संपत्ती!

Akhilesh Yadav Lok Sabha Nomination : जाणून घ्या, यादव कुटुंबीयांकडे एकूण रोकड, दागिने अन् जमीन किती?
Akhilesh Yadav
Akhilesh Yadav Sarkarnama
Published on
Updated on

Lokasbha Election 2024 : समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी कन्नौज मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार अखिलेश यादव आणि त्यांच्या कुटुंबाकडे जवळपास 42 कोटींची संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याविरोधात तीन खटले दाखल आहेत. शपथपत्रानुसार त्यांच्याजवळ 25 लाख 61 हजारांहून अधिक रोकड आहे. याशिवाय त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्याजवळ पाच लाख 72 हजारांहून अधिक नगदी रक्क आहे.

जवळपास दोन कोटी 30 लाख रुपयांची एफडीसुद्धा आहे, तर डिंपल यादव यांच्याकडे 76 लाखांहून अधिकची एफडी आहे. अखिलेश यादव(Akhilesh Yadav) यांच्या बचत खात्यामध्ये एक कोटी 49 लाखांहून अधिक रुपये जमा आहेत, तर त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्या सहा बचत खात्यांमध्ये तीन कोटी 16 लाख रुपयांहून अधिक रुपये जमा आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

याचबरोबर त्यांची मुलगी आदिती यादवच्या लखनऊमधील अॅक्सिस बँकेच्या बचत खात्यात 11 लाख 11 हजार रुपयांहून अधिक जमा आहे. त्यांचे लंडनच्या लॉयड्स बँकेतही एक खातं आहे, ज्यामध्ये 1595 पाउंड्स जमा आहे. अखिलेश यादव यांनी 2.13 कोटी रुपये आपले वडील मुलायमसिंह यादव आणि पत्नी डिंपल यादवला 54 लाख रुपयांहून अधिकचे कर्जही दिले आहे. त्यांनी आपल्या उत्पन्नाचा स्राेत शेती आणि जनहिताची कामे दर्शवला आहे. त्यांच्याकडे 17 एकर पेक्षा अधिक शेती योग्य जमीन आहे.

अखिलेश यादव यांच्याकडे सोने-चांदी किंवा अन्य कोणतीही आभूषण अथवा वस्तू नाहीत. 76 हजारांहून अधिक रुपयांचा एक मोबाइल फोन, 5 लाख 34 हजारांचे जीमचे साहित्य आणि 1 लाख 60 हजारांची क्रॉकरी आहे. डिंपल यादव(Dimple Yadav) यांच्याकडे जवळपास 60 लाखांचे दागिने आहे.. 2.774 किलो पेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि 127.75 कॅरेटचा हिरा आहे. ज्याची किंमत 59,76,687 रुपये आहे आणि 203 ग्रॅम मोती देखील आहेत.

Akhilesh Yadav
Rahul Gandhi News : मोदी आता घाबरलेत... काही दिवसांत स्टेजवर रडतील!

कन्नौज लोकसभा मतदारसंघातून अखिलेश यादव 2000 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यांनी 2004 आणि 2009ची निवडणूकही याच मतदारसंघातून जिंकली होती. 2012मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाच्या खासदरपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची पत्नी डिंपल या बिनविरोध निवडून आल्या होत्या. 2014च्या मोदी लाटेतही डिंपल या निवडणूक जिंकल्या होत्या. मात्र 2019च्या निवडणुकीत भाजपचे(BJP) सुब्रत पाठक यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.

यंदाच्या निवडणुकीत मैनपुरीमधून निवडणूक लढवत आहेत, तर अखिलेश यादव करहल मतदारसंघातून आमदार आहेत. कन्नौज मतदारसंघात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या ठिकाणी अखिलेश यादव यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com