
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवरून आज लोकसभेत भाजप सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. या प्रकरणात पारदर्शकता आणण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
महाकुंभातील चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आमच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी साधा शोक व्यक्त केला नाही. देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी शोक व्यक्त केल्यानंतर 17 तासांनी सरकारने ते स्वीकारले. मुख्यमंत्री 17 तास गप्प का राहिले, असा सवाल त्यांनी राज्यसभेत बोलताना त्यांनी विचारला.
सरकारने मृतांची अचूक आकडेवारी द्यावी तसेच, या घटनेत जखमी झालेल्या लोकांची व्यवस्था कशी केली, याची माहिती द्यावी. अशी मागणी केली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना अखिलेश यांनी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी बैठक बोलावण्याचीही मागणी केली आहे.
अखिलेश यांनी सरकारवर मोठा हल्लाबोल करत, धार्मिक मेळाव्यात राजकीय प्रचार करणे योग्य आहे का अशा सवाल उपस्थित केला. ही बाब अतिशय अशोभनीय आणि निंदनीय आहे.
'महाकुंभमध्ये झालेल्या घटनेनंतर हरवलेल्या लोकांना आणि सापडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी लष्कराकडे सोपवावी, अशी मागणी यावेळी अखिलेश यांनी केली. महाकुंभ घटनेतील मृतांची आकडेवारी, जखमींवर उपचार, औषधे, डॉक्टर, अन्न, पाणी आणि वाहतुकीची उपलब्धता संसदेत मांडली पाहिजे'.
महाकुंभ दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि सत्य लपवणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी यावेळी यादव यांनी केली. मी सरकारला विचारतो की जर चूक नव्हती तर आकडे का दाबले गेले, लपवले गेले ?
अखिलेश म्हणाले, "जेव्हा हे कळले की काही लोकांचे प्राण गेले आहेत, त्यांचे मृतदेह शवागारात आणि रुग्णालयात पडले आहेत, तेव्हा सरकारने त्यांचे हेलिकॉप्टर फुलांनी भरले आणि त्यांच्यावर फुले वर्षाव केली. ही कोणत्या प्रकारची सनातनी परंपरा आहे? देवालाच माहिती." किती लोकांचा मृत्यू झाला आहे. चप्पल, कपडे आणि साड्या आजूबाजूला पडल्या होत्या आणि त्या सर्व जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉलींनी उचलल्या गेल्या. हे सामान कुठे फेकले गेले हे कोणालाही माहिती नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.