प्रदेशाध्यक्षांविरोधात बंड; भाजपच्या सर्व समित्या तडकाफडकी बरखास्त

अनेक नेत्यांनी पक्षाचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला असून स्वतंत्र बैठकही घेतली जाणार असल्याची चर्चा आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

कोलकता : विधानसभा निवडणुकीसह (Assembly Election) कोलकता महापालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने पश्चिम बंगाल (West Bengal) भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. प्रदेशाध्यक्षांविरोधात अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त करत आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. तसेच काही नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे पक्षाने तडकाफडकी सर्व समित्या बरखास्त केल्या आहेत.

पक्षाकडून याबाबतचे पत्रक काढण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुकांता मुजुमदार (Sukanta Mujumdar) यांच्या सुचनेनुसार सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात येत आहेत. नव्याने नियुक्त्या होईपर्यंत हे विभाग बरखास्त राहतील, असं पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. भाजपमधील काही नेत्यांनी एकत्रित येऊन मुजुमदार यांच्याविरोधात आघाडी उघडल्याची चर्चा आहे. या नेत्यांची 15 जानेवारी रोजी बैठक होणार असल्याचे संकेत आहेत. त्यानंतर भाजपने हा निर्णय घेतला आहे.

BJP
''जर किरण माने दोषी तर शरद पोंक्षे, विक्रम गोखलेंवर कारवाई का नाही?"

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यांत पक्षाच्या 9 आमदारांसह काही नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून एक्झिट घेतली होती. केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर (Shantanu Thakur) यांचाही त्यात समावेश आहे. यामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत डावलल्याने नाराज असलेले हे नेते लवकरच पक्ष सोडणार आहेत, अशीही चर्चा आहे.

एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, पक्षात नाराज असलेल्या नेत्यांनी बैठक घेण्याचे ठरवले आहे. नव्या कार्यकारिणीतून जुन्या नेत्यांना वगळण्यात आलं आहे. अनेकांनी पक्ष उभा करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आम्ही कार्यकारिणीमध्ये बदल करण्याच्या विरोधात नाही. पण याचा अर्थ जुन्यांना कार्यकारिणीमध्ये स्थानच न देणं चुकीचे आहे. अनेकांची भाजपचे सरचिटणीस अमितव चक्रवर्ती यांच्याविषयी नाराजी आहे, असंही या नेत्याने सांगितलं.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजपला गळती लागली आहे. आता भाजपच्या (BJP) केंद्रीय मंत्र्यांसह 9 आमदार तृणमूल काँग्रेसच्या (TMC) वाटेवर असल्याचे समोर येत आहे. ते लवकरच भाजपला रामराम करुन तृणमूलमध्ये दाखल होतील, अशी शक्यता आहे. हे आमदार भाजपमध्ये नाराज असून, ते पक्षाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमधून डिसेंबर महिन्यात बाहेर पडले होते. यातील बहुतांश आमदार हे मटुआ समाजातील असून, आता केंद्रीय राज्यमंत्री ठाकूर यांनीही या आमदारांचे अनुकरण केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com