Krishna Janmabhoomi Case : मथुरेतील मशिदीत सर्वेक्षण; RSS चे नाव घेत ओवैसींनी केला मोठा आरोप

Allahabad HC Orders Survey of Shahi Idgah Mosque Asaduddin Owaisi Statement : मथुरेतील मशिदीच्या सर्वेक्षणावरून असदुद्दीने ओवैसी यांनी सूचक वक्तव्य केले आहे...
Asaduddin Ovesi MIM Latest News
Asaduddin Ovesi MIM Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Krishna Janmabhoomi Land Dispute : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीला लागू असलेल्या शाही मशिदीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. या प्रकरणावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कायद्याची चेष्टा चालवली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Asaduddin Ovesi MIM Latest News
Krishna Janmabhoomi Case : काशीनंतर आता मथुरेतील शाही मशिदीतही होणार सर्वेक्षण; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील शाही मशिदीतील सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुरापती वाढतील, हे बाबरी मशिद प्रकरणाच्या निकालानंतर बोललो होतो, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

मथुरेतील वाद हा कित्येक दशकांपूर्वी मशिद समिती आणि मंदिर ट्रस्ट यांच्या आपसातील सहमतीतून सोडवण्यात आला होता. काशी, मथुरा असो किंवा लखनऊमधील टीले वाली मशिद. कोणीही हा सामंजस्य करार वाचू शकतो. जुने वाद एका आता नवीन गटाकडून उकरून काढले जात आहेत, असा आरोप ओवैसी यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रार्थनास्थळ कायदा 1991 अजूनही आहे. पण एका गटाने कायदा आणि न्यायिक प्रक्रियेची चेष्टा चालवली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी येत्या 9 जानेवारीला सुनावणी होणार आहे. मग असे काय झाले की सर्वेक्षण करण्याचा निर्णय इतक्या लवकर देण्यात आला?, असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.

एका पक्षाकडून मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्याचे उपदेश देऊ नका. कायद्या गौण आहे. मुस्लिमांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणे हा या मागचा हेतू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Asaduddin Ovesi MIM Latest News
Supreme Court : राहुल गांधी केसचा संदर्भ देताच बसपा नेत्याला दिलासा; पुन्हा मिळणार खासदारकी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com